वेंगुर्ले :
वेंगुर्ले तालुक्यातील प्रसिद्ध आरवली श्री देव वेतोबाचा वार्षिक जत्रोत्सव २ डिसेंबर २०२४ रोजी होणार आहे. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जत्रोत्सवा दिवशी रात्री श्रींची पालखी, दारूसामान आणि फटाक्यांची आतषबाजी व दशावतारी नाट्य प्रयोग होणार आहेत. तर दुसऱ्या दिवशी ३ डिसेंबरला सकाळी तुलाभार, गुनिजन गायन गौरव कार्यक्रम होणार आहे. याच दिवशी श्री देवी सातेरीचाही वार्षिक जत्रोत्सव असल्यामुळे तिथेही रात्री देवीची पालखी प्रदक्षिणा, दारू सामान आतिषबाजी व दशावतारी नाटक यांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी भाविकांनी या दोन्ही जत्रोत्सवांमध्ये उपस्थित राहून देवतांचा आशीर्वाद घ्यावा, असे आवाहन श्री देव वेतोबा देवस्थान कमिटी आरवली यांनी केले आहे.