त्या’ कृषी पंपांना ओटवणेतून वीज द्या !
शेतकरी व बागायतदारांनी सावंतवाडीचे सहाय्यक वीज अभियंता सुशांत शिवणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली मागणी
ओटवणे
ओटवणे देऊळवाडी भानसे टेंब येथील कृषी पंपांना सरमळे गावातून वीज पुरवठा केल्यामुळे सुरळीत पुरवठा होत नाही. याचा फटका शेतकऱ्यांसह बागायतदारांना बसतो. त्यामुळे या कृषी पंपांना नवीन वीज वाहिनी टाकून ओटवणे गावातून वीजपुरवठा करावा, अशी मागणी या वाडीतील शेतकरी व बागायतदारांनी सावंतवाडीचे सहाय्यक वीज अभियंता सुशांत शिवणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. ओटवणे-देऊळवाडीतील भानसे टेंब येथील कृषी पंपांना सरमळे गावातून वीजपुरवठा केला जातो. मात्र, ही वीज वाहिनी जंगल भागातून तसेच तेरेखोल नदी वरून ओटवणे गावात येते. त्यामुळे या वाहिनीत सातत्याने बिघाड होऊन वीजपुरवठा ठप्प होतो. वीजपुरवठा सुरळीत. करण्यासाठी सरमळे गावातील वायरमनला कळवावे लागते. मात्र, त्यांच्याकडे तीन गावांचा कार्यभार असल्यामुळे वीजपुरवठा वेळेत सुरू होत नाही. याचा फटका शेतकरी व बागायतदारांना बसतो. त्यामुळे
या कृषी पंपांना ओटवणे गावातून
वीजपुरवठा देण्याची शेतकऱ्यांची
गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी
आहे. यावेळी सहाय्यक अभियंता सुशांत शिवणे यांनी नवीन वीजवाहिनी टाकण्याबाबत सर्व्हे करून तसा प्रस्ताव वीज वितरण कंपनीसह जिल्हा नियोजनकडे पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी नारायण भानसे, सुधीर गावकर, दाजी भानसे, मोहन भानसे, आबा भानसे, संतोष भानसे, न्हानू भानसे आदी शेतकरी व बागायतदार उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…