You are currently viewing श्री देवी माऊलीच्या जत्रोत्सवाचे औचित्य साधून कार्तिक अमावस्या निमित्त “दीपोत्सव २०२४”

श्री देवी माऊलीच्या जत्रोत्सवाचे औचित्य साधून कार्तिक अमावस्या निमित्त “दीपोत्सव २०२४”

श्री देवी माऊलीच्या जत्रोत्सवाचे औचित्य साधून कार्तिक अमावस्या निमित्त “दीपोत्सव २०२४”

सतर्क पोलीस टाईम्स, अखिल भारतीय भंडारी समाज महासंघ व कै.श्री राजन बापू रेडकर मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

वेंगुर्ला

स्वयंभू श्री देवी माऊलीच्या आशीर्वादाने वार्षिक जत्रोत्सवाचे औचित्य साधून कार्तिक अमावस्या, शनिवार दिनांक ३० नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६.०० वाजल्यानंतर श्री सप्तेश्वर (स्वयंभू) महादेव मंदिर, रेडी, तालुका-वेंगुर्ला येथे १००१ दीप प्रज्वलित करून गावातील सामाजिक ऐक्य व बांधिलकी जपण्याचे उद्दिष्ट ठेवून “दीपोत्सव २०२४” कार्यक्रमाच्या नियोजन करण्यात आले आहे.

दिपोत्सव या कार्यक्रमात भारतमातेच्या शहिद झालेल्या वीर जवानांकरिता आदरांजली म्हणून “एक दीप भारतमातेच्या वीर जवानांसाठी ” दीप प्रज्वलित करण्यात येणार आहे.

दीपोत्सवाचे यंदाचे आठवे वर्ष असून ह्या कार्यक्रमात स्वयंभू श्री सप्तेश्वर महादेवाच्या मंदिरात सुवासिनी स्त्रियांकडून पूजन करून नंतर संपूर्ण मंदिराला दिव्यांनी सजवून आपल्या भारत मातेच्या रक्षणासाठी अविरत लढणाऱ्या व लढता लढता शहिद झालेल्या वीर भारतीय जवानांसाठी दीपोत्सवाच्या माध्यमातून आदरांजली वाहण्यात येणार आहे.

सदर कार्यक्रम हा सतर्क पोलीस टाईम्स, अखिल भारतीय भंडारी समाज महासंघ व कै.श्री राजन बापू रेडकर मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत आहे. तरी सर्व नागरिकांनी ह्या कार्यक्रमास उपस्थिती दर्शवावी ही विनंती.

प्रतिक्रिया व्यक्त करा