You are currently viewing अंतिम वर्षाच्या परीक्षा संदर्भात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राज्यपालांची घेतली भेट..

अंतिम वर्षाच्या परीक्षा संदर्भात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राज्यपालांची घेतली भेट..

उद्या राज्यपाल महोदय यांच्यासोबत सर्व अकृषी विद्यापींठाच्या कुलगुरूंची बैठक

मुंबई :
अंतिम वर्षाच्या परीक्षा संदर्भात आज उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनावर भेट घेतली. उद्या दुपारी ४:०० वाजता राज्यपाल महोदय यांच्या उपस्थितीत सर्व अकृषी विद्यापींठाचे कुलगुरू यांची बैठक होणार आहे.
अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत करून केलेली कार्यवाही, अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा बाबतच्या भावना, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर कुलगुरू सोबत झालेल्या बैठकांची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राज्यपाल महोदय यांना दिली.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले, परीक्षा सहज, सोप्या पद्धतीने कशा घेता येतील यावर विचार करावा. कुलगुरू यांचे काय म्हणणे आहे ते जाणून घ्यावे समितीचा अहवाल आल्या नंतर त्यावर चर्चा करून विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा आशा सूचना राज्यपाल महोदय यांनी यावेळी केल्या.
श्री. सामंत म्हणाले, उद्या दुपारी ४:०० वाजता राज्यपाल महोदय यांच्या सोबत बैठक होणार आहे. या बैठकीनंतर राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, यांच्या उपस्थितीत होईल आणि त्यानंतर समिती चा अहवाल सादर केला जाईल असेही श्री. सामंत यांनी येवेळी सांगितले.
यावेळी उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजीव जलोटा उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty − nineteen =