*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास म्हणजेच सन्माननीय सदस्य कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*सुवर्ण करा*
विझली ज्योती सुकली माती
सखे सोबती संपली प्रिती
गेले घेऊन काय सोबती
आयुष्यातून तुटली नाती
आठवणीत राहून फक्त
जीव तुमचा गेला सोडून
मणुष्य प्राण आला देहात
तसाच तो ही गेला सोडून
चांगले गुण वाईट गुण
सारे इथेच सोडून जातो
कर्तव्य मुक्त होऊन देह
नाव आपले पुसून जातो
जीवन तुम्ही सार्थकी लावा
सत्य धर्माचे पालन करा
निस्वार्थ पणे कर्म करून
आयुष्याचे हो सुवर्ण करा…
कवी :-
*चंद्रशेखर प्रभाकर कासार*
*चांदवडकर, धुळे.*
७५८८३१८५४३.