*ज्येष्ठ लेखिका कवयित्री अनुराधा जोशी लिखित अप्रतिम मुक्तच्छंद काव्यरचना*
*वृक्षराज*
शांत जलाशयाच्या तिरावर ,
ऊभा एकलाच वृक्ष,
निरखित स्वत;चेच प्रतिबिंब,
माळ हिरवा, झुडपेही हिरवी
मग मीच असा कसा ,
गुलाब पुष्पा परी
बघता त्याचे गुलाबी प्रतिबिंब ,
विस्मये इतर थरथरती,
ऊतरून नभ येई जलाशयी,
सांगे वृक्षास…. शापित देवकन्या येतात रात्री खेळायास,
विसरून गेल्या गुलबकावलीच्या फुलास,
त्या फुलातून जन्म घेसी तू तरूवरा,
रंगलास गुलाबी मनोहर,
शोभून दिससी या सृष्टीवर,
वृक्षराजच तू खरोखर.
अनुराधा जोशी