मतदार संघाचा विकास कसा असतो हे येत्या पाच वर्षात दाखवून देऊ – बाबा मोंडकर
भाजपा महायुतीचा विजय जनतेला समर्पित…
मालवण
कुडाळ – मालवण विधानसभा मतदार संघातून महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांचा मोठ्या मताधिक्याने झालेला विजय हा जनतेचा विजय आहे. मतदार संघाच्या विकासाचा रथ सन २०१४ मध्ये अविश्वासाचे नाते निर्माण करत वैभव नाईक यांनी रोखला होता. मात्र यावेळच्या निवडूकीत मिळालेल्या विजयानंतर जनतेच्या माध्यमातून हा विकासाचा रथ २०२४ पासून पुन्हा एकदा ताकदीने भाजप आणि महायुतीच्या वतीने पुढे नेणार आहोत असा विश्वास भाजपचे शहराध्यक्ष बाबा मोंडकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
येथील भाजप कार्यालयात पत्रकार परिषद झाली. यावेळी सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, राजन वराडकर, आबा हडकर, अन्वेशा आचरेकर, पूजा वेरलकर, के. पी. चव्हाण, ललित चव्हाण, जगदीश गावकर, कमलाकर पराडकर, श्री. मोरजकर यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
श्री. मोंडकर म्हणाले, खऱ्या अर्थाने या मतदारसंघांमध्ये निलेश राणे यांचा जो प्रचंड मताधिक्याने विजय झालेला आहे हा विजय खऱ्या अर्थाने जनतेचा विजय आहे. १९९५ सालापासून नारायण राणे यांनी या मतदारसंघाचा विकासाचा आलेख हा ज्या पद्धतीने उंचावलेला होता. त्या विकासाला २०१४ मध्ये अविश्वासाचे नातं निर्माण करून जो वैभव नाईक यांनी विकासाला छेद म्हणजे विकासाचा रथ रोखला होता तो आता जनतेच्या माध्यमातून या मतदारसंघांमध्ये या २०२४ पासून परत एकदा पूर्णपणे ताकदीने भाजप, महायुतीचे पदाधिकारी पुढे घेऊन जाणार आहोत. विधानसभा निवडणुकीत ज्या पद्धतीने विरोधी लोकांकडून जो काय प्रचार चालू होता. उमेदवारांबद्दल खोट सांगणे. संघटने बद्दल वेगवेगळे गैरसमज जनतेमध्ये पसरवणे, धनशक्तीचा वापर करणे असे सगळे प्रयत्न करून देखील कुडाळ मालवणची जनता भारतीय जनता पार्टी महायुती सोबत राहिल्यामुळे हा विजय मिळाला असून तो या जनतेला समर्पित आहे. महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी म्हणजे नारायण राणे, रवींद्र चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शहराच्या नियोजनामध्ये सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, राजन वराडकर तसेच महिला मोर्चाच्या चारुशीला आचरेकर, युवा मोर्चाचे ललित चव्हाण या सगळ्यांच्या योग्य नियोजनामुळे हा विजय आम्ही खऱ्या अर्थाने खेचून आणू शकलो.
निवडणुकीत या मतदार संघात राणेंनी केलेले काम म्हणजेच आरोग्य, रोजगार, पर्यटन, मच्छीमारांच्या समस्या असतील. त्यानंतर निलेश राणे यांनी गेल्या चार वर्षांमध्ये या मतदारसंघांमध्ये विशेष लक्ष घालून केलेली कामे ही ज्या पद्धतीने आम्ही जनतेसमोर मांडली. त्याला जनतेचा प्रतिसाद मिळाला. मतदानामध्ये जी महिलांची मताची टक्केवारी होती ती पण वाढलेली दिसली. संपूर्ण किनारपट्टी ही भाजप, महायुतीच्या सोबत दिसली. पर्यटन व्यवसायिक, समाजामध्ये असलेला प्रत्येक घटक हा भाजप, महायुती सोबत राहिल्याचे दिसून आले. शहराचा विचार करता निवडणुकीमध्ये जी काय आश्वासन भाजप, महायुतीकडून देण्यात आली. त्या आश्वासनाला पूर्ण करण्यात येणाऱ्या काळात आम्ही युतीचे कार्यकर्ते आणि आमचे नेते कमी पडणार नाहीत. मालवण मध्ये जे बंद पडलेले सर्व प्रकल्प आहेत. मग एसटी स्टँडचं अर्धवट राहिलेलं बांधकाम, शॉपिंग कॉम्प्लेक्स, मच्छीमार्केटचे काम, अग्निशमनची इमारत असेल. त्या सगळ्या गोष्टी आम्ही पूर्ण करूच. पण त्याबरोबर या शहरामध्ये रोजगार पर्यटन पूरक ज्या गोष्टी आहेत म्हणजे जसे चिवलाच्या धर्तीवर रोषणाई केली. त्याच पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये आपण दांडेश्वर मंदिर आणि त्या भागाचा परिसर त्याच्यानंतर मोरयाचा धोंडा या भागातला जो काय आम्ही शब्द दिला होता त्याची पूर्तता करण्याबरोबर या भागामध्ये रोजगारभिमुख पर्यटन वाढीचे सगळे उपक्रम येणाऱ्या काळामध्ये भाजप, महायुतीच्या माध्यमातून आम्ही पूर्णत्वास नेऊ असे श्री. मोंडकर यांनी सांगितले.
महायुतीने जनतेसमोर रोजगार, मतदार संघाचा दहा वर्षाचा रखडलेला विकास, त्यानंतर महाराष्ट्राच्या नेतृत्वाने दिलेला नारा होता तो म्हणजे एक है तो सेफ है, बटेंगे तो कटेंगे, हिंदुत्व या अनेक मुद्द्यांवर भाजप काम करत होती. ते मुद्दे घेऊन आम्ही जनतेसमोर गेलो. जनतेसमोर विकासाचे मॉडेल ठेवले त्यामुळेच मालवण शहराने देखील या विधानसभेच्या निवडणुकीत मताधिक्य दिले आहे. जनतेने दिलेली जबाबदारी पुढच्या पाच वर्षांमध्ये निश्चित भाजप, महायुती, आमदार निलेश राणे सर्व पदाधिकारी मतदार संघाचा विकास काय असतो हे आम्ही दाखवून देऊ असा विश्वास श्री. मोंडकर यांनी यावेळी व्यक्त केला.
Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous article
मालवणात ७ ते १२ जानेवारी काळात