राणे समर्थकांकडून आपल्याच कार्यकर्त्यांचे प्रवेश

राणे समर्थकांकडून आपल्याच कार्यकर्त्यांचे प्रवेश

शिवसेना तालुकाप्रमुख डाॅ. प्रथमेश सावंत यांचा आरोप

कणकवली
हरकुळ खुर्द जिल्हा परिषद मतदार संघातील शिवसैनिकांचा भाजपात पक्षप्रवेश हे भाजपने बनविलेले नाटक आहे. वास्तविक प्रवेशकर्ते कार्यकर्ते हे शिवसैनिक कधीच नव्हते. या कार्यकर्त्यांनी यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये राणे समर्थकांचे काम केले असल्याचा दावा शिवसेना तालुकाप्रमुख डॉ. प्रथमेश सावंत यांनी केला आहे. त्यामुळे राणे व त्यांच्या भाजपने आपल्याच कार्यकर्त्यांच्या प्रवेशाची नाटके करू नयेत, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
श्री सावंत यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, आमदार नितेश राणे यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे प्रवेशकर्त्यांनी सांगितल्याचे माझ्या वाचण्यात आले. पण याच मंडळींनी मागील विधानसभा निवडणुकीतही राणे यांचा प्रचार केला होता. हरकुळ खुर्द जि. प. मतदारसंघात शिवसेना नेते तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेची दमदार वाटचाल सुरू आहे. म्हणूनच राणेसमर्थक भाजपच्या पायाखालची वाळू सरकत असल्याचे सावंत म्हणाले. वास्तविक सच्चा शिवसैनिक शिवसेनेला कधीच सोडचिठ्ठी देणार नाही. गद्दार आहेत ते यापूर्वीच आमच्यातून निघून गेले व आज संपण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे यापुढे राणेसमर्थक व भाजपने आपल्या कार्यकर्त्यांचे प्रवेश घेऊन स्वतःचे हसे करून घेऊ नये, असेही सावंत यांनी म्हटले आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा