*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम काव्यरचना*
*वाढदिवस*
पुण्यच नाही केलं तुम्ही तर
पुण्यतिथी कोण साजरी करणार ?
पापच एवढं केलेलंय की
जयंती ही कोण साजरी करणार ?? ।।१।।
सारी असते भीती माणसाला
भीतीशिवाय कुणीच जगत नाही
फायद्याशिवाय कुणीही पुरुष
एकमेकांकडे खरंच बघत नाही ।।२।।
ज्ञान कुणालाच नकोय इथे
विज्ञान मात्र सगळेच हवे !!
मेलो तरी बेहत्तर म्हणतात
भौतिक सुखाचेच हव्यासी थवे ।।३।।
आळस वाढला तरी चालेल
आजार वाढला तरी चालेल
अध्यात्माला दाखवून पाठ
मनोरुग्ण झाले तरी चालेल ।।४।।
जयंत्या आणि पुण्यतिथ्या कुणी
नाही करणार मेल्यावर साजरे
या भीतीनेच सगळे अॅपस् वर
करुन घेतात वाढदिवस साजरे !!।।५।।
कार्यमग्नता हवी तुम्हापाशी नित्य
मृत्यू ही तर कायमची विश्रांती
फावल्या वेळेत तुम्ही काय करतात
यावर तर ठरते तुमची संस्कृती ।।६।।
*©सर्वस्पर्शी*
©कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख.
नाशिक , ९८२३२१९५५०