You are currently viewing फुटपाथ.. आणि.. माझं व्यक्तीमत्व..!!

फुटपाथ.. आणि.. माझं व्यक्तीमत्व..!!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

*फुटपाथ.. आणि.. माझं व्यक्तीमत्व..!!*

हरवलेलं माझं मौन
फुटपाथावरून जाताजाता परतलं
जगण्याचा अर्थ कळताच
फाटलेलं व्यक्तीमत्व गवसलं..!

खांदे उडवत….म्हणालो
काय फरक पडतो
एकटा का ……असेना
माझं मीचं ठरवतो…

गर्दीतून जाता-जाता मागे
इसवीसन फरफटत आले
जगणचं फुटपाथवर पसरलेलं
गणित आयुष्याचे जमले..

दाणागोटा,कदर,प्रतिष्ठा
पाठीला टांगून ठेवलं
माझ्या पाठीच व्यासपीठ
वक्तव्याकरता खुले केलं…

पाठीमागे हसणारे चेहरे
फुटपाथ लक्षांत ठेवतो
बर्फात मौन भिजवून
संधीची वाट पाहतो…

फुटपाथावरून जाताजाता पुढे
रस्ता संपत गेला..
वेड्या जगण्याचा आव
फुटपाथने मला दिला..

आपलेचं म्हणणारे पाहून
न पाहिल्यासारखं करतो
नियतीचे निष्ठावान अड्डे
नष्ट करायला घेतो …….!

स्वतःचा शोध घेतांना
आगळी मुसाफिरी केली
आपलीच किंमत शोधतांना
फुटपाथनेचं ओळख दिली…!

बाबा ठाकूर धन्यवाद

प्रतिक्रिया व्यक्त करा