You are currently viewing शिक्षणमंत्री केसरकर यांचा विजयाचा चौकार

शिक्षणमंत्री केसरकर यांचा विजयाचा चौकार

सावंतवाडी :

सावंतवाडीच्या जनतेच्या प्रेमामुळेच मी चौथ्यांदा विजयी झालो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी केलेल्या कामाचा हा विजय आहे. खरी शिवसेना कोणाची हे जनतेन आज सिद्ध केलं आहे. बाळासाहेबांचे खरे वारसदार एकनाथ शिंदे असल्याचे जनतेनं दाखवून दिले. तर माझ डिपॉझिट जप्त करण्याची भाषा करणाऱ्यांना माझ्या मताधिक्या पर्यंत पोहचता आलं नाही, असा टोला हाणत विरोधकांवर चौथ्यांदा आमदार म्हणून विजयी झालेल्या दीपक केसरकर यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.

श्री. केसरकर म्हणाले, चांगलं बॉंन्डींग असणार जनतेला न्याय देणार आमचं सरकार आहे. मंत्री म्हणून मी काम केलं आहे. जिल्ह्यात राणेंची साथ आमच्यासह आहे. अनेकांनी माझ्या विजयासाठी मेहनत घेतली. युवराज लखमराजे भोंसले, संजू परब, महेश सारंग, मनिष दळवींसह भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आदींसह महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. माझा विजयाचे श्रेय सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सावंतवाडीच्या जनतेला श्रेय देतो. निलेश राणे विजयी झाले याचा मला सर्वाधिक आनंद झाला. नितेश राणे यांचा विजय निश्चित होता. कोकणात महायुतीचा विजय झाला आहे. खरी शिवसेना कोणाची हे जनतेन सिद्ध केलं आहे. बाळासाहेब ठाकरेंना अपेक्षित हे सरकार असून त्यांच्या विचारांवर चालणारी लोक या सरकारमध्ये आहेत. खासदार आणि तिन्ही आमदार आमचे आहेत. त्यामुळे येत्या एका वर्षात सर्वांगीण विकास सिंधुदुर्गचा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महिला आघाडी, युवासेनेन देखील मोठ काम माझ्यासाठी केलं असं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, माझ डिपॉझिट जप्त करण्याची भाषा करणाऱ्यांना माझ्या मताधिक्या पर्यंत पोहचता आलं नाही. तरूण पिढी बरबाद होण्यापासून मी वाचवू शकलो याचा आनंद आहे. तिसऱ्यांदा ज्यांना लोकांनी नाकारलं त्यांनी आता आपल्या गावाला जाव असाही टोला त्यांनी लगावला. विरोधीपक्ष नेत्याला लागणार मताधिक्य विरोधकांना मिळणार नाही. जनतेनं त्यांना जागा दाखवून दिली. बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार हे एकनाथ शिंदे आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचे दीपक केसरकर यांनी सांगितले. मुख्यमंत्री जी जबाबदारी देतील ती जबाबदारी स्वीकारून त्याला न्याय देण्याच काम करेन असा विश्वास व्यक्त केला. कोकणसाठी काम करण्यावर माझा विशेष भर असणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस असवेत असं वाटतं. एकनाथ शिंदे यांच्या मेहनतीचा विचार पुन्हा व्हावा. नरेंद्र मोदी व अमित शहांसह वरिष्ठ योग्य निर्णय घेतील. माझ्या विरोधात कोणी उभं राहील म्हणून मी त्रास देणार नाही. मनी लॉड्रींग, शेतकऱ्यांना कोणी त्रास दिला तर त्याला सोडणार नाही असा इशाराही दिला. यावेळी शिवसेना जिल्हा संघटक संजू परब, युवराज लखमराजे भोंसले आदींसह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा