You are currently viewing आचरा पर्यावरण प्रेमींनी समुद्र किनारा केला स्वच्छ

आचरा पर्यावरण प्रेमींनी समुद्र किनारा केला स्वच्छ

मोठया प्रमाणात प्लास्टिक, वाहून आलेला कचरा केला गोळा

तळेरे

कोरोना काळातील लॉक डाऊनला शिथिलता मिळाल्यानंतर आचरा किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणत पर्यटक दाखल झाले होते. त्यांनी टाकलेल्या बाटल्या, पिशव्या,इतर प्लास्टिक वस्तू अशा टाकाऊ वस्तूंमुळे आचरा किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कच-यामुळे अस्वच्छ झालेली होती तसेच समुद्रातुन वाहत आलेला कचराही मोठ्या प्रमाणात साठला होता.

पत्रकार मित्रांसह लोकप्रतिनिधीही सरसावले!!

समुद्र किनारा साफ करण्यासाठी आचरा पत्रकारमित्र परेश सावंत, उदय बापर्डेकर व पोलीस पाटील जगन्नाथ जोशी यांनी आचरा किनाऱ्यावर स्वच्छता मोहीम राबवण्याचे ठरवून स्वछता मोहीमेत सहभागी होण्याचे आवाहन व्हाट्सप माध्यमातून या उपक्रमाबद्दल आवाहन केल्याने याला प्रतिसाद देत आचरा गावच्या प्रथम नागरिक तथा सरपंच मॅडम प्रणया टेमकर, माजी सरपंच व विद्यमान सदस्य मंगेश टेमकर, गजानन मेडिकलचे विद्यानंद परब, विवेक गुरव, निखिल ढेकणे,पंकज आचरेकर, सिद्धार्थ हजारे, जीवरक्षक अक्षय वाडेकर यांनी सहभागी होत श्रमपरिहार करीत संपुर्ण आचरा किणारपट्टी कचरामुक्त केली.सामाजिक बांधिलकी जपत आचरा परिसरातील पत्रकार मित्रांनी व लोकप्रतिनिधींबरोबरच ग्रामस्थांनी केलेली ही कामगिरी निश्चितच कौतुकास्पद आहे.

मोफत सानिटायझर…

यावेळी गजानन मेडिकल स्टोअरचे विद्यानंद परब यांनी स्वच्छता मोहिमेत सहभागी सर्व पर्यावरण प्रेमींना स्वखर्चाने सॅनिटायझरचे वाटप केले. या सागर किनारा स्वछता मोहिमेत आवाहन केल्यानंतर सहभागी झालेल्या आचरा सरपंच टेमकर यांच्यासह उपस्थित सर्व पर्यावरणप्रेमींचे पत्रकार परेश सावंत यांनी आभार मानले


उदय बापर्डेकर
प्लास्टिक व वाहून आलेला कचरा पर्यावरणप्रेमींनी गोळा करत आचरा समुद्रकिनारा स्वच्छ केला आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा