मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी कुडासे गावातील युवाईचा आदर्श
दोडामार्ग :
विधानसभा निवडणूक मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी कुडासे गावांत यावेळी युवकांनी घेतलेली मेहनत कौतुकास्पद आहे. कुडासे गावठाण येथे तब्बल ७७ टक्केमतदान करत युवकांनी देशाची लोकशाही बळकट करण्याच्या कर्तव्यात मोठं योगदान दिल्याने टीमचं कौतुक होत आहे.
तब्बल ९५ वर्षाच्या मंगला देसाई या अजिबाईंनी सुद्धा थेट मतदान केंद्रावरूनच मतदानाचा हक्क बजावला. देसाई यांचा नातू चेतन व अन्य युवकांनी या आजिबाईंना त्यांचा मतदानाचा हक्क बजावण्यास मदत केली. गावातील एकही उपस्थित मतदानापासून वंचित राहणार नाही यांची विशेष काळजी तेथील युवकांनी घेतली. महायुतीच्या बूथवर असलेल्या प्रसाद कुडासकर, चेतन देसाई, हरी देसाई, राजन परब, राघोबा देसाई, संतोष देसाई, राजन देसाई, किशोर देसाई, प्रविण देसाई, लक्ष्मण देसाई व अन्य सहकारऱ्यानी दीपक केसरकर यांच्यासाठी विशेष मेहनत घेतली. मात्र गावातील वाढलेले मतदान हे या निवडणुकीच विशेष ठरले.