तरुण पिढीने सत्यविजय भिसे यांच्या कार्याचा आदर्शआत्मसात करणे गरजेचे – संदेश पारकर
शिवडाव येथे कै. सत्यविजय भिसे यांचा २२ वा. स्मृतिदिन साजरा
कणकवली
कै. सत्यविजय भिसे यांचा राजकारण आणि समाजकारणात असलेला नावलौकीक काही अपप्रवृत्तींना मान्य नसल्याने त्या अपप्रवृत्तीने कै. सत्यविजय भिसे यांची हत्या केली.त्या अपप्रवृत्तीला नियतीने धडा शिकवला. आज सत्यविजय भिसे जिवंत असते तर जिल्ह्याच्या राजकारणात अग्रस्थानी असले असते. त्यांच्या सामाजिक कार्याचा वारसा भिसे कुटूंबिय आणि मित्रमंडळ जपत आहे. तरुणपिढीने देखील त्यांच्या समाजसेवेचा वारसा आत्मसात करणे गरजेचे आहे . असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी केले.ते शिवडाव राऊतखोलवाडी येथे सत्यविजय भिसेंच्या स्मृतिदिनाच्या कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर,माजी जि.प.सदस्य बाळा भिसे, उद्योजक शंकर पार्सेकर, दिनेश नाडकर्णी, रंजन चिके, शिवडाव सरपंच नितीश भिसे, उपसरपंच सायली तेली, विलास गावकर, संजय पारकर,सचिन आचरेकर , शिरवल सोसायटीचे चेअरमन रविकांत सावंत, शिवसेना कळसुली विभाग प्रमुख चंदु परब,शिरवल उपसरपंच प्रवीण तांबे, वनिता जाधव, कै. सत्यविजय भिसे मित्र मंडळाचे अध्यक्ष सत्यवान जाधव, रवी राणे,लवू वाळके,लवू पवार,मधुकर चव्हाण,शिवडाव तंटामुक्ती अध्यक्ष बंडू लाड,सत्यविजय जाधव, भारती देसाई , वैशाली पाटील, श्रीकांत तेली , नितीन हरमलकर, नितिन गावकर,गणेश शिवडावकर, सुनील हरमलकर, गणंजय तेली, निकेतन भिसे, दीपक कोरगावकर, महेश शिरसाट,संतोष मुरकर, बाबू परब, प्रेमानंद कोरगावकर, प्रमोद नानचे,नंदू परब, संतोष दळवी, गणेश म्हसकर, कृष्णा चाळके, संदीप शिरसाट, काशिनाथ गावकर सत्यविजय भिसे प्रेमी आदी उपस्थित होते.
यावेळी संदेश पारकर म्हणाले की, बावीस वर्षाचा काळ उलटून गेला तरी सत्यविजय भिसे यांचे कार्य लोक विसरु शकले नाहीत, अशा प्रकारचे कार्य सत्यविजय भिसेंचे होते. म्हणूनच आजचा हा विचारांचा प्रवास हा पुढच्या काळात सुरु ठेऊया. कुठेतरी सत्यविजय भिसेंच्या नावांमध्ये सत्याचा विजय आहे . त्यामुळे सत्याचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही.नियती निश्चितपणे न्याय देईल. सत्यविजय हे लढवय्या कार्यकर्ते होते. त्यांनी नेहमीच अन्यायाविरुद्ध संघर्ष केला होता. त्यामुळे ते सर्वसामान्य गोरगरिबांचे कैवारी बनले होते. असे नेतृत्व समाजाभिमुख होईल याच भीतीनेच विरोधकांनी आणि काही अपप्रवृत्तीने सत्यविजय भिसे यांचा बळी घेतला.मात्र नियती या प्रवृत्तीला सोडणार नाही.सत्यविजय भिसे हा विचार होता.चळवळ होती. तरुण पिढीने त्यांच्या सामाजिक कार्याचा आदर्श जोपासावा.असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी केले.
आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक कै.काका भिसे कणकवली तालुक्याचे एक ज्येष्ठ नेतृत्व होते.सातत्याने समाजात राहून सामाजिक बांधिलकी जपताना समाजाचे काम करत होते.आणि त्यांचाच वारसा बाळा भिसे आणि सत्यविजय भिसे,यांनी घेतला. शिवडाव पंचक्रोशीसह कणकवली तालुक्यात भिसे परिवाराने सामाजिक कार्यातून आपला दबदबा निर्माण केला आहे.
सत्यविजय भिसे यांच्या स्मृती जपण्याचे काम गेली 22 वर्षे सातत्याने कै. सत्यविजय भिसे मित्र मंडळ करीत आहे. रक्तदान शिबिर, आरोग्य शिबीर, सांस्कृतिक, कला, क्रीडा, शैक्षणिक उपक्रम राबवून कै. सत्यविजय भिसे मित्र मंडळ त्यांच्या स्मृतीला उजाळा देत आहे. हे त्यांचे कार्य निश्चितच गौरवास्पद आहे.वारकऱ्यांचा सत्कार ,आरोग्य विषयक उपक्रम असे विविध उपक्रम राबवून हे मंडळ सामाजिक बांधिलकी जपतानाच सत्यविजय भिसेंच्या स्मृतींना उजाळा देत आहे .त्यांच्या कार्याचा आदर्श तरुण पिढीने जोपासावा. असे आवाहन संदेश पारकर यांनी केले.
शिवडाव येथे कै. सत्यविजय भिसे यांचा आज २२ वा. स्मृतिदिन साजरा करण्यात आला. यावेळी आमदार वैभव नाईक, शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले.त्यात ५२ रक्तदात्यांनी रक्तदान केले. तसेच वारकरी संप्रदायातील ५० वारकऱ्यांचा शाल , श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी आम.वैभव नाईक,सत्यविजय जाधव, दिनेश नाडकर्णी ,भारती देसाई यांनी आपले विचार व्यक्त केले.यावेळी सत्यविजय भिसे प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.