You are currently viewing वर्ल्ड पीस हार्मोनीच्या उपाध्यक्षपदी श्री मेहबूब कासार यांची निवड

वर्ल्ड पीस हार्मोनीच्या उपाध्यक्षपदी श्री मेहबूब कासार यांची निवड

अमरावती दि. 22 –

स्थानिक मिशन आयएएस या शैक्षणिक संस्थेचे आजीव सभासद श्री मेहबूब कासार यांची आंतरराष्ट्रीय वर्ड पीस हार्मोनीच्या उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे. या संस्थेचे मुख्यालय दिल्ली येथे असून ही संस्था जागतिक स्तरावर आंतरराष्ट्रीय सुसंवाद साधण्यासाठी 2012 या वर्षापासून कार्यरत आहे . श्री मेहबूब कासार यांनी आतापर्यंत विविध सामाजिक शैक्षणिक साहित्यिक उपक्रम सातत्याने राबविले आहेत. महाराष्ट्रातील विद्यार्थी बहुसंख्येने प्रशासनात जावे यासाठी त्यांनी अल हम्द एज्युकेशन व कल्चरल सोसायटी स्थापन केली असून त्यामार्फत संपूर्ण महाराष्ट्रात वेळोवेळी वेगवेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते .या संस्थेतर्फे लवकरच सोलापूर जिल्ह्यात सहा एकराच्या परिसरामध्ये स्पर्धा परीक्षा केंद्र व इतर उपक्रम सुरू करण्यात येणार आहेत ,

त्या दृष्टिकोनातून श्री मेहबूब कासार यांनी पुढाकार घेतलेला आहे श्री मेहबूब कासार हे मिशन आहे याचे विभागीय संचालक आहेत. याशिवाय शब्दवेल साहित्य संमेलन पुणे येथे आयोजित करण्यात त्यांचा पुढाकार राहिलेला आहे . महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षेचे वातावरण वृद्धिंगत करण्यामध्ये करण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रात ठिकठिकाणी स्पर्धा परीक्षा कार्यशाळा घेतल्या आहेत. याशिवाय त्यांनी दोन वर्ष बिनपगारी रजा घेऊन विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिलेले आहे. वर्ल्ड पीस हार्मोनी ही आंतरराष्ट्रीय संस्था असून या संस्थेमध्ये वेगळ्या देशातील तसेच भारतातील अनेक मोठ्या मान्यवरांचा सहभाग आहे. या संस्थेचे अध्यक्ष श्री हाजी शकील सैफी यांनी श्री मेहबूब कासार यांचे सामाजिक व शैक्षणिक कार्य पाहून त्यांना या संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्त केले आहे. त्यांच्या या आंतरराष्ट्रीय बहुमानाबद्दल मिशन आयएएसचे संचालक प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे व त्यांचे सहकारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

 

प्रकाशनार्थ

प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे

संचालक मिशन आयएएस

अमरावती कॅम्प 9890967003

प्रतिक्रिया व्यक्त करा