सावंतवाडी :
नेमळे गावचे जागृत देवस्थान श्री देवी सातेरी देवस्थानच्या वार्षिक जत्रोत्सव शनिवार दिनांक २३ नोव्हेंबर रोजी होणार असून माहेर वासीनीची ओटी भरण्याची जत्रा म्हणून प्रसिद्ध आहे.
दरवर्षी या जत्रेला मुंबई, कोल्हापूर, गोवा येथून मोठ्या संख्येने भाविक येतात. नवसाला पावणारी देवी म्हणूनही या देवीची प्रसिद्धी आहे. यानिमित्त सकाळपासून धार्मिक कार्यक्रम तशीच रात्री आजगावकर दशावतार नाट्य मंडळाचे नाटक होणार आहे. सर्वांनी दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन गावकर मंडळी तसेच ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.