कुडाळ :
भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी रानबांबुळी येथे प्रथम क्रमांकावर मतदानाचा अधिकार बजावला. यावेळी पत्नी शिल्पा सावंत, सरपंच परशुराम परब उपस्थित होते. आम्ही मतदान केलं, आपणही लगेच करा आणि आपले कुटुंबीय आणि आपल्या मित्र परिवाराला सुद्धा १०० टक्के मतदानाचा आग्रह करा असे आवाहन भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केले आहे.