नागपूर:
थिऑसॅफिकल ऑर्डर ऑफ सर्व्हिस,मैत्रैय लाॅज नागपूर व अखिल भारतीय सावित्री ब्रिगेड, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने मानव विकास प्रशिक्षण व पुनर्वसन केंद्र मानवाश्रम, खापा येथे थिऑसाॅफिकल सोसायटीचा १४९ वा स्थापना दिन साजरा करण्याकरिता अनोखा दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रम अध्यक्षा डॉ. स्मिता मेहेत्रे व टि.ओ.एस.चे निशिकांत मेहेत्रे यांनी आयोजित केला . भारतातील पहिले मनोरुग्ण निवास व पुनर्वसन मानवाश्रमचे संस्थापक राजाभाऊ जोध व प्रीती जोध यांनी मेंटल हॉस्पिटल मधून बाहेर पडलेल्या पण घरचे त्यांना परत घेण्यास इच्छुक नसलेल्या विविध शहरांतील साठ मनोरुग्णांना या मानवाश्रममध्ये आश्रय देऊन त्यांना सेवाभाव व रोजगार दिल्याने सुधारलेल्या रुग्णांची माहिती दिली. डॉ. स्मिता मेहेत्रे यांनी प्रीती जोध यांचा माहेरची साडी व रोपटे देऊन सत्कार केला. तसेच निशिकांत मेहेत्रे यांनी राजाभाऊ जोध यांच्या थोर कार्याबद्दल शाल, श्रीफळ व विचारपुष्प देऊन सत्कार केला . “थिऑसाॅफिकल सोसायटी व मानवसेवा” या विषयावर डॉ.स्मिता मेहेत्रे यांनी प्रकाश टाकला.मानवाश्रम येथे थिऑसाॅफिकल सोसायटीच्या तीस सदस्यांनी या सामाजिक कार्यात सहभाग घेतला. यावेळी मनोरुग्णांना ब्लॅंकेट्स, टॉवेल्स , चादरी, साड्या ,कपडे ,कडधान्य, रोख रक्कम ,व धनादेश देऊन त्यांच्या दुःखी जीवनात आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अखिल भारतीय सावित्री ब्रिगेड तर्फे मनीषा जलितने देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच नाही हे गीत सादर केले .तसेच सुनंदा जांबुतकर, मंगला मोटघरे, स्वाती इनकाने यांनी हीच आमची प्रार्थना… हे गीत सादर केले .वंदना क्षिरसागर व समूहाने योगनृत्य सादर केले. कार्यक्रमात प्रेरित होऊन मनोरुग्ण रितेश शेळके व इतर रुग्णांनी सुद्धा सुरेख गीत सादर केले. निशिकांत मेहेत्रे यांनी निष्काम कर्मयोग म्हणजे काय? सांगितला.डॉ. कळमकर, डॉ. चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. इतका स्तुत्य उपक्रम आयोजित करून सहभागी केल्याबद्दल डॉ. स्मिता मेहेत्रे यांचे सदस्यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणोती कळमकर यांनी केले तर आभार प्रदर्शन विद्या सुरकार यांनी केले .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रेखा हिरुडकर, आदित्य कावडे ,ज्योती मुन, राणी शहा, रवींद्र सुपारे यांनी सहकार्य केले.