*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे लेखक कवी वि. ग. सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*
*आश्वासकता*
*************
जगणे जगती जगुनी जाहले
ते सारे भाळीचे भोगणे होते
असतो पराधीन जन्म मानवी
वास्तव लोचनी तरळले होते
मनपाखरुंही हे भाबडे बिचारे
उगा आसक्तीत गुंतलेले होते
मृगजळापाठी व्यर्थ धावताना
श्वास सर्वांगी थकुनी गेले होते
जीवनाचे खेळ सारे सारीपाटी
याचे प्रत्यन्तर आज आले होते
तरीही प्रीतीचा तो भुलभुलैया
जगणे सक्तीचे करून गेले होते
मनपाखरुं हेही भाबडे बिचारे
आजही शून्यात भिरभरत होते
अश्वासकताही ही असे संभ्रमी
मनांतरास कळुनी चुकले होते
************************
*रचना क्र. १८७*
*#©️वि.ग.सातपुते. (भावकवी).*
*📞(9766544908) बेंगलोर*