पाणलोस येथील राणे समर्थकांचा वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश
आमदार वैभव नाईक मालवणचे नगरसेवक मंदार केणी यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्ष प्रवेश

पाणलोस येथील राणे समर्थकांचा वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

मालवण तालुक्यातील पाणलोस (पूर्व) गावातील राणे समर्थकांनी आज कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक, मालवणचे नगरसेवक मंदार केणी यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला. कणकवली विजय भवन येथे आ.वैभव नाईक यांनी शिवबंधन बांधून तसेच पक्षाच्या शाली घालून प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत केले.

नगरसेवक मंदार केणी यांच्या नेतृत्वाखाली पाणलोस येथील सुशील बाईत, आदीनाथ घाडीगांवकर, सुधीर घाडीगांवकर, स्वप्निल बाईत,नीरज घाडीगांवकर, कैलास बाईत, महेश बाईत, दिलीप घाडी, हनुमंत बाईत, सुमित बाईत, संदेश मुळये, रामदास घाडी, श्रीजी घाडी, प्रकाश बाईत, सुरज बाईत, शरद बाईत आदींनी शिवसेना पक्षाचा झेंडा हाती घेतला.

आमदार वैभव नाईक यांनी मतदारसंघात केलेली विकास कामे, कोरोना काळातही जनतेसाठी त्यांनी केलेली कामगिरी, त्याचबरोबर त्यांच्या माध्यमातून पाणलोस गावाचा होत असलेल्या विकासास प्रेरीत होऊन आपण शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे या युवकांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा