*कसल्याही आमिषाला बळी न पडता 20 नोव्हेंबरला प्रत्येकाने प्रामाणिकपणे मतदानाचा हक्क बजवायचाच. -रवी जाधव*
सावंतवाडी
मतदानाचा हक्क हा सर्वसाधारण हक्क नसून भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी व्यक्ती स्वातंत्र्याला दिलेला एक मूलभूत अधिकार आहे ज्या वर आपल्या देशाचं भवितव्य अवलंबून आहे.
20 नोव्हेंबर 2024 ला मतदान करा आपल्या आरोग्याच्या सोयी सुविधांसाठी, मतदान करा आपल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळण्यासाठी, मतदान करा युवा रोजगार निर्मितीसाठी, मतदान करा भ्रष्टाचारी व महागाई रोखण्यासाठी आणि मतदान करा आपला महाराष्ट्र व भारत देश सक्षम घडवण्यासाठी.
यापैकी कोणीही लायक नाही म्हणून नोटाच बटन दाबणे म्हणजे मतदान न करण्या सारखच आहे असं न करता आजच ठरवा आपल्या मनातील योग्य उमेदवार जो तुमचे हे प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी बांधिल असेल.
परंतु काळजीपूर्वक एक गोष्ट लक्षात ठेवा चुकूनही आपलं बहुमूल्य मत विकू नका ज्याने आपले अधिकार व हक्क पुन्हा पुढील पाच वर्षासाठी वेशीला टांगले जातील.
मत विकत घेऊन निवडून येणाऱ्या उमेदवाराकडून जर आपली कामं झाली नाही तर पुढच्या पाच वर्षानंतर पुन्हा तोच उमेदवार जेव्हा तुमच्या दारी परत मत मागण्यासाठी येईल तेव्हा आपण विचाराल की तुम्हीं आमच्यासाठी काय केलात? तेव्हा असा प्रश्न विचारण्याचा नैतिक अधिकार तुम्हाला मुळीच नसेल एवढंच लक्षात ठेवा.
बंधू आणि भगिनींनू म्हणूनच काळजीपूर्वक व कळकळीने सांगाव लागतं अजूनही वेळ गेली नाही. लक्षात ठेवा 20 नोव्हेंबरला मतदानाचा हक्क हा बजवायचाच कारण हिच एक सर्वश्रेष्ठ संधी आहे आपला महाराष्ट्र व देश विकसनशील बनवण्यासाठी योग्य उमेदवाराची निवड करणे हे फक्त तुमच्या एका बोटाच्या ताकतीत आहे.
म्हणूनच म्हणतो आपलं बहुमूल्य मत देण्यासाठी कुठच्याही प्रकारची तडजोड न करता येत्या 20 नोव्हेंबरला सकाळी सात ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आपल्या जवळच्या मतदान केंद्रामध्ये जाऊन प्रामाणिकपणे आपल्या बहुमूल्य मतदानाचा हक्क बजावा आणि स्वतःचं व आपल्या प्रत्येक माणसांच एक उज्वल भविष्य घडवण्यासाठी पुढे व्हा.
एवढीच आपल्याला सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान सिंधुदुर्ग च्या वतीने विनंती करीत आहे धन्यवाद.🙏
रवी जाधव
सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान सिंधुदुर्ग