You are currently viewing झपूर्झा

झपूर्झा

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री चित्रकारा स्वप्नगंधा सतीश आंबेतकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*झपूर्झा*

 

मन्मनी मोहरले‌ गीत नवे

जे वाटे नीत हवे हवे

फुलवित नवा स्वप्न झुला

हिंदोळा झुले संगीत नवे

🌹🌹🌹

मन्मयूर फुलवित रंगपिसारा

शब्दांचा ओसंडून वाहे डोलारा

उलगडे शब्दकोशाचा नजारा

नावरे भिरभिरता काव्यफुलोरा

🦚🦚🦚

बकुळफुलांपरी जपले शब्द मी

सुगंध त्यांचा ठाव घेई अंतरी

भिरभिरत्या वायूसंगे गंधलहरी

परिमळल्या रसिकांच्या अंतरी

🌼🌼🌼

नित्य नवविषयांच्या शब्दलहरी

मधुरनादे जणू वाजे बासरी

भावनांचा फुलोरा मोबाईलवरी

नित्य नवा शब्दालंकार अंतरी

🌦️🌧️🌊

उचंबळले भरते सागरासमअंतरी

ओथंबले भावशब्द हृदयांतरी

नटरंगी दुनियेचे प्रतिबिंब दिसता

अबोल शब्दउमटले कागदावरी

🌞🌝🌎

निसर्गाच्या सान्निध्यी काव्यस्फुरे

भावपुष्पांची शब्द किमया उतरे

सुखदुःख,प्रेम,माया,उद्वेग,आवेग

सप्तरंगी इंद्रधनुषीझपुर्झाअवतरे!

 

🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈

स्वप्न गंधा सतीश ‌आंबेतकर

मुंबई. विरार

प्रतिक्रिया व्यक्त करा