You are currently viewing मालवण नगरपरिषदेद्वारे आयोजित मतदान जनजागृती कार्यक्रमांचे कुडाळ विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळुशे यांच्याकडून कौतुक

मालवण नगरपरिषदेद्वारे आयोजित मतदान जनजागृती कार्यक्रमांचे कुडाळ विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळुशे यांच्याकडून कौतुक

*मालवण नगरपरिषदेद्वारे आयोजित मतदान जनजागृती कार्यक्रमांचे कुडाळ विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळुशे यांच्याकडून कौतुक*

मालवण

दिनांक 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा मतदानात जास्तीत मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी व मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हा प्रशासनाद्वारे SVEEP (Systematic Voters Education & Electoral Participation Program) अंतर्गत विविध माध्यमातून जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी दिलेल्या निर्देशानुसार मालवण नगरपरिषदेने मागील लोकसभा निवडणुकी प्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही मतदान जनजागृतीसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे. प्रामुख्याने यात सोशल मीडिया व रिल्सच्या माध्यमातून नगरपरिषदेने मतदारांना केलेले आवाहन लक्षवेधी ठरले आहे. मालवण नगरपरिषदेने मतदार जनजागृतीसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमांचे कुडाळ विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुशे यांनी कौतुक केले.
मालवण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्या संकल्पनेतून गेले पंधरा दिवस मतदान जनजागृतीसाठी मोटारसायकल रॅली, पथनाट्य, माहितीपर बॅनर्स, सेल्फी पॉईंट्स, मतदान शपथ या सोबतच सोशल मीडिया व रिल्सद्वारे मतदान जनजागृती करण्यात येत आहे. मालवण नगरपरिषदेच्या मतदार जनजागृती कार्यक्रमात सिने अभिनेते विजय पाटकर यांनीही सहभागी होऊन रीलद्वारे मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले होते तसेच सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना व स्थानिक कलाकारांना घेऊन नगरपरिषदेने तयार केलेली रिल नागरिकांमध्ये विशेष लक्षवेधी ठरली आहे. नगरपरिषदेने मतदान जनजागृतीसाठी आयोजित केलेले विविध कार्यक्रम व जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी केलेला सोशल मीडियाचा वापर तसेच रिल्सद्वारे करण्यात आलेली जनजागृती यामुळे नक्कीच कुडाळ विधानसभा मतदार संघात मतदान टक्केवारीत भर पडेल असा विश्वास व्यक्त करत निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुशे यांनी नगरपरिषदेच्या उपक्रमांचे कौतुक केले व सर्व मतदारांना मतदान करण्याचेही आवाहन त्यांनी केले.

*संवाद मीडिया*

*🚔 कृष्णामाई बोअरवेल*🚍

*💦 आमच्याकडे ४.५’ , ६’ आणि ६.५’ बोअरवेल खोदून मिळेल*🏟️

*💦 तसेच HDPE पाईप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन व पंप सेट लगेच बसवून मिळतील.*
https://sanwadmedia.com/114772/

*💦 रस्त्यापासून ५०० फूट अंतरावर लांब गाडी लावून अडचणीच्या ठिकाणी देखील बोअरवेल खोदून मिळेल*🚖🏟️

*👉 पत्ता : मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे, तालुका कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

*♻️ प्रोप्रा. : आनंद रामदास*

*संपर्क*

*📲9422381263 / 📲7720842463*

*जाहिरात लिंक*👇
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा