You are currently viewing अंक दिवाळी

अंक दिवाळी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य लेखक कवी श्रीनिवास गडकरी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*अंक दिवाळी*

 

दिवस सुटीचे, आनंदाने सजवत जातो अंक दिवाळी

आम्ही सारे मिळता हाती नाचत जातो अंक दिवाळी

 

नवीन कपडे, फराळ कंदिल याच्या पुढती फिकेच पडती

भान विसरूनी,मनापासुनी वाचत जातो अंक दिवाळी

 

अनेकअंगी साहित्याची इथे अनोखी मैफिल भरते

वाचनातुनी संस्कारांना घडवत जातो अंक दिवाळी

 

मतमतांतरे वाचुन सारी विचार वैभव वाढत गेले

पूर्वग्रहाना डोक्यामधुनी काढत जातो अंक दिवाळी

 

साहित्याच्या अनेक प्रांती सफर मजेची करून येतो

कवितेमधुनी तरल भावना लहरत जातो अंक दिवाळी

 

कोरा कागद, ओली शाई, पानोपानी रंगित चित्रे

मिळता हाती जीव आपला हरखत जातो अंक दिवाळी

 

या साऱ्याने दिले घेतले आयुष्याला पुरून उरले

अजून त्यांच्या स्मरणामधुनी बहरत जातो अंक दिवाळी

 

श्रीनिवास गडकरी

रोहा पेण पुणे

9130861304

केवळ नावासहितच पुढे पाठवावे

@ सर्व हक्क सुरक्षित

प्रतिक्रिया व्यक्त करा