ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रात मतदानासाठी 15 रोजी स्थानिक सुट्टी

ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रात मतदानासाठी 15 रोजी स्थानिक सुट्टी

सिंधुदुर्गनगरी 

जिल्ह्यातील 70 ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी दिनांक 15 जानेवारी 2021 रोजी सकाळी 7.30 ते सायं. 5.30 या वेळेत  मतदान होणार आहे. सदर दिवस हा कार्यालयीन कामकाजाचा दिवस आहे. त्यामुळे यादिवशी निवडणूक असलेल्या ग्रामपंचायत क्षेत्रातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी शुक्रवार दिनांक 15 जानेवारी 2021 रोजी जिल्हाधिकारी यांनी त्यांना प्राप्त झालेल्या अधिकारानुसार सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम लागू असलेल्या क्षेत्रात स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा