सोनुर्ली माऊली जत्रौत्सवात भाविकांची अलोट गर्दी…
सावंतवाडी
दक्षिण कोकणचे प्रति पंढरपुर म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री देवी सोनुर्ली माऊलीचा वार्षिक जत्रौत्सवास काल संपन्न झाला. लोटांगणाची जत्रा म्हणून प्रसिद्ध असलेल्या देवी माऊलीच्या जत्रौत्सवासाठी महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक व इतर राज्यातूनही भाविकांनी पहाटेपासूनच सोनुर्लीत गर्दी केली होती.
जत्रौत्सवानिमित्त दर्शनासाठी व ओटी भरण्यासाठी पहाटेपासूनच हजारोंच्या संख्येने भविकांच्या रांगा लागल्या आहेत. पोलिस प्रशासनाबरोबरच देवस्थान कमिटी व स्थानिक भक्त मंडळाने चोख नियोजन केले असल्यामुळे भाविकांना सुलभपणे दर्शन घेता आले. रात्री उशिरा पर्यंत लोटांगण सोहळा संपन्न झाला.