You are currently viewing 37 वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची आत्महत्या 

37 वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची आत्महत्या 

37 वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची आत्महत्या

घरातच आढळला मृतदेह

मुंबई

काजोलसह ‘द ट्रायल’ या वेबसीरिजमध्ये काम करणारी अभिनेत्री नूर मलाबिका दास हिने आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आलं आहे. ३७ वर्षीय अभिनेत्री यापूर्वी कतार एअरवेजमध्ये एअर होस्टेस म्हणून काम करत होती.

पोलिसांनी ६ जून रोजी लोखंडवाला येथील तिच्या फ्लॅटमधून मृतदेह ताब्यात घेतला. अभिनेत्रीने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. मात्र अभिनेत्रीच्या आत्महत्येच्या अहवालाची अद्याप संपूर्ण बातमी समोर आलेली नाही.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पोलिसांनी सांगितले की, ही घटना तेव्हा उघडकीस आली जेव्हा शेजाऱ्यांना फ्लॅटमधून दुर्गंधी येऊ लागली. त्यांनी तत्काळ ओशिवरा पोलिस स्थानकात याबाबत माहिती दिली. पथक घटनास्थळी पोहोचल्यावर त्यांनी दरवाजा तोडला आणि आत गेल्यावर पोलिसांना नूरचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत पंख्याला लटकलेला आढळला. पोलिसांनी घराची झडती घेतली असता औषधे, मोबाईल फोन व डायरी जप्त केली.

अभिनेत्रीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी गोरेगावच्या सिद्धार्थ रुग्णालयात नेण्यात आला. तिच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्यात आला मात्र कोणीही पुढे आले नाही. परिणामी, शहरातील बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या एनजीओच्या मदतीने पोलिसांनी रविवारी, ९ जून रोजी तिच्यावर अंत्यसंस्कार केले.

नूर मलाबिका ही मूळची आसामची होती. याआधी अभिनेत्रीने अनेक हिंदी चित्रपट व वेबसीरिजमध्ये काम केले होते. यामध्ये ‘सिसियान’, ‘वॉकमन’, ‘तिखी चटणी’, ‘जघन्या उपया’, ‘चार्मसुख’, ‘देखी उंडेखी’, ‘बॅकरोड हस्टल’ या चित्रपटांचा समावेश आहे. तसेच ती डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रसारित ‘द ट्रायल’ मध्ये काजोल व जिशु सेनगुप्ताबरोबर दिसली होती.

*संवाद मीडिया*

👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕

*‌प्रवेश सुरू….प्रवेश सुरू….प्रवेश सुरू…….*

*शिक्षणासोबत नोकरीची हमी* *फक्त*!!!!

*👉दि यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट,*👩‍⚕👩‍⚕

*शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता….(ऍडमिशन) प्रवेश* *सुरु आहे*.
https://sanwadmedia.com/137740/

*दि यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट,* रत्नागिरी येथे १२ वी उत्तीर्ण रत्नागिरीतील विद्यार्थी/ विद्यार्थिनींना प्रवेश घेण्याकरिता सुवर्ण संधी.
खालील अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरु.
*▪️B.Sc Nursing*
*▪️Post Basic B.Sc Nursing*
*▪️M.Sc Nursing*
*▪️GNM*
*▪️ANM*

_अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नामांकित हॉस्पिटल मध्ये १००% नोकरीची हमी, तसेच परदेशात सुद्धा काम करण्याची सुवर्ण संधी._

_राज्य सरकारच्या नियमानुसार शिष्यवृत्तीची सोय उपलब्ध तसेच मर्यादित विद्यार्थ्यांना खाजगी संस्था कडून शिष्यवृत्ती चा लाभ._

_प्रवेश निश्चित करण्याकरिता खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा._
*📲८६००३०२४५४*
*📲९४२३२९१८६३*
*📲८८३०७८९५७०*

*प्रवेशासाठी अधिक माहितीकरिता खालील लिंक क्लिक करून आपली माहिती सादर करा.*

https://forms.gle/4i3u6hNgVriV7Msr7

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/137740/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा