You are currently viewing वेंगुर्ले येथे युवा सप्ताह अंतर्गत पथनाट्यातून जनजागृती….

वेंगुर्ले येथे युवा सप्ताह अंतर्गत पथनाट्यातून जनजागृती….

नेहरु युवा केंद्र सिंधुदुर्ग व वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्गचा उपक्रम

​​वेंगुर्ले

नेह​​रू युवा केंद्र सिंधुदुर्ग आणि वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने युवा सप्ताहचे आयोजन करण्यात आले असून आज वेंगुर्ले येथे पथनाट्यातून समाज प्रबोधन व जाणीव जागृती करण्यात आली.
स्वामी विवेकानंद जयंती राष्ट्रीय युवक दिनाच्या औचित्याने १२ ते १९ जानेवारी दरम्यान सदर युवा सप्ताहाअंतर्गत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नेहरू युवा केंद्र व वेताळ प्रतिष्ठानच्यावतीने वेंगुर्ला येथील बस स्थानक, साई मंदिर, दाभोली नाका, वेंगुर्ला बाजारपेठ, नाथ पै रॉड,​ ​खर्डेकर रोड अशा सार्वजनिक ठिकाणी पथनाट्य सादर करण्यात आले. या पथनाट्याच्या माध्यमातून ‘अन्न वाचवा’ संदेश देत सामाजिक प्रबोधन करण्यात आले. दैनंदिन जीवनात अन्नाचे महत्व सर्वज्ञात आहे परंतु​ ​अनेक शुल्लक घटनांनी होणारा अन्नाचा अपव्यय, त्याची कारणे, त्याचे सामाजिक परिणाम, यावरील उपाय अशा स्वरूपात संदेश देण्याच्या उद्देशाने आणि आजच्या युवकांची यासाठी असलेली भूमिका पथनाट्यातून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला.

दिव्यता मसुरकर, भाग्यश्री वेळकर,​ ​योगीता सावंत, तेजस्वी सावंत, वृषाली केरकर, योगिता आईर, हर्षा खवणेकर, हसरी आरावंदेकर, पूनम आईर, अंकिता कांबळी, अक्षता आईर,​ ​गौरवी आईर यांनी पथनाट्य सादर केले. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन परुळकर, सहसचिव महेश राऊळ, किरण राऊळ, प्रतीक परुळकर,​ ​प्रवीण राऊळ आदी उपस्थित होते.​​

प्रतिक्रिया व्यक्त करा