मुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे यांच्या कार्याने प्रेरीत होऊन कार्यकर्त्यांचा शिवसेना (शिंदे) पक्षात प्रवेश
उपजिल्हाप्रमुख श्री.महिंद्र सावंत व तालुका प्रमुख श्री.शरद वायंगणकर यांनी शाल घालून केले स्वागत
कणकवली
शिवसेना मध्यवर्ती कार्यालय कणकवली येथे 15नोव्हेंबर रोजी मा. मुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या कार्याने प्रेरीत होऊन श्री. गुरुप्रसाद अशोक कोकाटे व प्रशांत प्रकाश चव्हाण राहणार साळीस्ते यांनी व इतर कार्यकर्त्यांनी शिवसेना (शिंदे)पक्षात प्रवेश केला.
त्यावेळी उपजिल्हाप्रमुख श्री.महिंद्र सावंत व तालुका प्रमुख श्री.शरद वायंगणकर यांनी शाल घालून स्वागत केले.यावेळी महिला जिल्हा प्रमुख वर्षाताई कुडाळकर, उपजिल्हाप्रमुख सरिता राऊत, तालुका प्रमुख प्रिया टेंबकर,शोभा बागवे,फोंडा सरपंच संजना आग्रे,उपतालुका प्रमुख श्री.दामोदर सावंत,सुनील सावंत,युवा जिल्हा प्रमुख मेहुल धुमाळे विभागप्रमुख बाबू आचरेकर,रांगणेकर मॅडम,प्राची धुरी, vansker म्हसकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.