केसरकरांच्या कार्याचे विरोधकांना पोटशूळ- अशोक दळवी
सावंतवाडी
गेली पंधरा वर्षे सावंतवाडी मतदारसंघाचे नेतृत्व करणारे महायुतीचे उमेदवार शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची व प्रतिस्पर्धी उमेदवारांची तुलनाच होऊ शकत नाही. गेल्या पाच वर्षात अडीच हजार कोटीहून अधिक निधी त्यांनी मतदारसंघासाठी आणला आहे. त्यांच्या कार्याचे राज्यातील इतर आमदारही कौतुक करतात. अनेक वर्ष राजकारण व समाजकारणात वावरताना केतकरांनी कधीही द्वेषाचे राजकारण केले नाही. मात्र, विरोधकांकडे विकासाचे मुद्दे नसल्याने त्यांच्याकडून बिन बुडाचे आरोप केले जात आहेत. महायुतीच्या सभेला होणारी गर्दी पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. व्यक्तीद्वेषाने पछाडलेल्या विरोधकांना केसरकारांच्या कार्याचे पोटशूळ उठले आहे, अशी टीका शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांनी केली.
दळवी पुढे म्हणाले , व्यक्तीद्वेषाने पछाडलेले डोळ्यावर पट्टी बांधून वावरत आहेत. त्यामुळे मतदार संघातील त्यांना विकास दिसत नाही. बाहेरून आलेल्यांना या मतदारसंघाची आस्था तरी काय असणार , हा प्रश्न आहेच. कार्यसम्राट केसरकर यांचा विजय होणार ही काळात दगडावरची रेघ आहे . आता फक्त उत्सुकता आहे ती किती मताधिक्य मिळणार ते. मोठे मताधिक्य घेऊन केसरकर निश्चितच विजयी होणार , असा ठाम विश्वास मतदारच व्यक्त करीत आहे. विरोधकांमध्ये दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर राहण्यासाठी स्पर्धा सुरू आहे .
दळवी पुढे म्हणाले, काही कुवत नसलेल्या व्यक्ती मतदारसंघात उद्योग निर्माण करणार, रुग्णालय उभारणार अशी बालिश वक्तव्य करीत आहेत. मात्र, कोणतेही व्हिजन नसलेल्या, मतदारसंघात बाहेरून आलेल्या या व्यक्तींची वक्तव्य हास्यास्पद वाटत आहेत . मुळात विकास विकासासाठी अभ्यास, अनुभव असावा लागतो. त्यामुळे आरोग्य व रोजगार प्रश्न सोडवण्याची ताकद कार्यसम्राट केसरकर यांच्याकडेच आहे. मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचा प्रश्न तांत्रिक अडचणीमुळे रखडला आहे तो आता 100% प्रश्न सुटणार आहे. लवकरच भव्य दिव्य असे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभे राहणार आहे. रोजगार निर्मितीचे अनेक प्रकल्प प्रस्तावित आहेत. आडाळी येथे अनेक कंपन्या येणार आहेत . केसरकारांच्या संकल्पनेतून अनेक पर्यटन प्रकल्प उभे राहणार आहेत. या माध्यमातून भविष्यात मोठा रोजगार प्राप्त होणार आहे . मात्र, प्रतिस्पर्धी उमेदवार रोजगार व आरोग्याचा प्रश्न आम्ही सोडणार असल्याच्या बाता मारत आहेत. कुठच्या माध्यमातून तुम्ही हा प्रश्न सोडवणार असा सवाल मतदारच विरोधी उमेदवारांना विचारत आहेत.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , अजित दादा पवार , माजी मुख्यमंत्री नारायण राणे , पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे विश्वासू सहकारी म्हणून केसरकर यांची ख्याती आहे. विकासाचा व्हिजन असलेले शांत व संयमी नेतृत्व विरुद्ध कोणत्याही प्रकारची व्हिजन नसलेले, विकासाची आस नसलेले नेतृत्व अशी लढाई मतदारसंघात आहे . त्यांचा विनयशीलता सुसंस्कृतपणा व कार्यापुढे प्रतिस्पर्धी उमेदवार फिके पडत आहेत . गावागावातील बैठकीमध्ये त्यांना मिळणारा प्रतिसाद , विविध संघटनांनी त्यांना जाहीर केलेला पाठिंबा , त्यांच्या प्रचारात असलेली यंग ब्रिगेड , नारीशक्ती, शेतकरी बागायतदार , ज्येष्ठ नागरिक अशी सर्व स्तरातील मंडळी त्यांच्या प्रचारात सहभाग घेत आहेत, हीच त्यांच्या विजयाची नांदी आहे. विरोधकांकडे कोणतेच मुद्दे नसल्यामुळे त्यांच्यावर टीका करीत आहेत. दुसऱ्यावर टीका करण्यापेक्षा स्वतःच्या पायाखालचा अंधार त्याने पहिल्यांदा पहावा . राज्यातील अनेक आमदार , मंत्री केसकर यांचे मार्गदर्शन घेतात . त्यांचे सर्व भाषेवरील प्रभुत्व , सभागृहातील अभ्यासपूर्ण भाषण सर्वांनाच भावते. अशा या संयमी अभ्यासू नेतृत्वाचा सर्वांनाच अभिमान आहे आणि या मतदारसंघालाही त्यांच्या नेतृत्वाची गरज आहे. मतदारसंघात फिरताना त्यांच्या कार्याचे मतदारांकडून होणारे कौतुक आम्ही प्रचारात प्रत्यक्ष पाहत आहोत . शिक्षण मंत्री पद त्यांना मिळाल्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांनी मंत्री पदाची शान वाढवली . शिक्षण क्षेत्रात अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले. अनेक वर्षानंतर रखडलेली शिक्षक भरती केली. शिक्षण सेवक अंगणवाडी सेविका यांच्या मानधनात भरीव वाढ केली . केंद्र शासनाच्या सूचनेनुसार राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी केली जनतेच्या मनात आजाराचे स्थान निर्माण केलेल्या केसरकरांना पुन्हा आमदार व मंत्री होण्यासाठी सर्व स्तरातील जनता त्यांच्या प्रचारात उत्स्फूर्त सहभाग घेत आहे.
केसरकर यांच्या विजयासाठी महायुतीचे पदाधिकारी एक दिलाने काम करीत आहेत. कुणी कितीही बाता मारल्यात तरी विजयाचा गुलाल आम्हीच उधळणार आहोत . मात्र महायुतीच्या कार्यकर्त्यांनी गाफिल न राहता केसरकरांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी कंबर कसावी,असे आवाहन जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांनी केले.