मुंबई चैत्यभूमीचे व्यवस्थापक प्रतीक कांबळे यांनी रवी जाधव यांच्या कुटुंबावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडणारा लेक वाचून थेट सावंतवाडी गाठली.
सावंतवाडी
रवी जाधव यांनी अन्यायाला वाचा फोडणारे प्रसिद्ध केलेले लेख पूर्ण महाराष्ट्रभर पोचतात त्याची दखल थेट चैत्यभूमीचे प्रतीक कांबळे, सामाजिक कार्यकर्ते राजाराम जाधव, भगीरथ सेवा मंडळ मुंबई चे अध्यक्ष बौध्दचार्य नरेश सकपाळ, ज्येष्ठ पत्रकार मोहन जाधव यांच्यासह स्वप्नील चंदनशिवे शैलेश माने राजेंद्र माने इत्यादीयांनी आज सकाळी रवी जाधव यांच्या घरी भेट देऊन सर्व वस्तूंची माहिती घेतली व आम्ही सर्व तुमच्या या लढ्यात पाठीशी आहोत अशी ग्वाही दिली. त्यावर ते म्हणाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलं होतं की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो ते प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही.
खरंच तुमच कौतुक याच्यासाठीच करतो की तुम्ही अतिशय प्रामाणिक व सेवाभावी आहात तुम्ही तुमच्या लढा असाच पुढे सुरू ठेवला .
खऱ्या अर्थाने याचा बोध येथील युवा पिढी नक्कीच घेईल आणि तीही अशा प्रकारच्या अन्यायाविरुद्ध नक्कीच पेटून उठेल.
तुमचं हे शहर आहे आणि या शहरामध्ये तुम्ही हक्काने व प्रामाणिकपणे कमवून खाऊ शकतात. तरी आपल्या या संदर्भात येथील नेत्यांनी आपली दखल घेणे योग्यच होतं परंतु दुर्दैव.
सर्व वस्तुस्थिती पाहता तुमची लढाई योग्य दिशेने चालली आहे. तुम्ही हा अन्यायाविरुद्ध लढा उभारला आहे तो योग्यच आहे. त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल मी व समाज तुमच्या आता कायम पाठीशी उभा राहील काळजी करू नका.