*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*शब्दकळेच्या …झळा..!!*
एकोणतीसावे..!!
निरखून बघण्याचा हक्क
शब्दही राखून ठेवतात
जात पंथ धर्माकडे
कल्लोळातही पाठ फिरवतात..
खैरातीचे दुष्परिणाम शब्दही
शुष्क वेदना भोगतात
चाल चलन चरित्राकडे
स्वखुशीने दुर्लक्ष करतात..
कलगीतु-याच्या अजस्र धांदलीत
शब्दांचा सहभागचं नसतो
शब्दकळेच्या कोरड्या झळांनी
सन्मानाच्या पायघड्या उलगडतो..
अट्टाहास शब्दांनाही जडतो
देखणी तंद्री लागते
अज्ञानापोटी विशुद्ध हेतूने
तुच्छभाव चिमटीत पकडते..
शब्दकळेचा उत्सव…उपद्रव
बंधनातून मुक्त राहतो
वाह्यातपणा चालूचं ठेवतं
कुंपणांना अदृश्य करतो…
बाबा ठाकूर