You are currently viewing आला श्रावण श्रावण

आला श्रावण श्रावण

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*आला श्रावण श्रावण* 

 

आला श्रावण श्रावण

मन भावन पावन

येई पाठीशी धाऊन

विठू श्रावण श्रावण ||१||

 

नाग पंचमी श्रावण

जन्म अष्टमी श्रावण

रक्षा बंधन श्रावण

सण लेऊन श्रावण ||२||

 

धार संतत श्रावण

ऊन सावली श्रावण

गाती कोकिळा श्रावण

रान हिरवे श्रावण ||३||

 

जीव भाळतो श्रावण

प्रेम वेडा हा श्रावण

कुठे जगी हो श्रावण?

भुमी भारती श्रावण ||४||

 

येता श्रावण श्रावण

बळीराजा आनंदून

त्याची खिल्लारी हो जोडी

शेतं फुलवी श्रावण ||५||

 

आला श्रावण श्रावण

शेतां मातीत श्रावण

राब राबता राबून

सोनं पिकवी श्रावण ||६||

 

आला श्रावण श्रावण

लेकी भिजल्या नाचून

ढोल ताशे वाजवित

येतो तरूण श्रावण ||७||

 

आला श्रावण श्रावण

पुलकित तन-मन

दवबिंदू तृणावर

मोती वर्षावे श्रावण ||८||

 

कवी:-

*चंद्रशेखर प्रभाकर कासार*

*चांदवडकर, धुळे.*

७५८८३१८५४३.

 

*संवाद मिडिया*

 

*आतुरता गणपती बाप्पाच्या आगमनाची – ओंकार ट्रेडर्स*

 

*लिंक वर क्लिक करा 👇*

————————————————–

*आतुरता गणपती बाप्पाच्या आगमनाची…*🙏🏻😇

 

*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव☝️ ठिकाण जिथे गणपतीसाठी लागणारे सर्वकाही मिळेल एका छताखाली 😇 तेही अगदी माफक दरात..*

 

🌐 https://sanwadmedia.com/105547

 

🎨 *ओंकार ट्रेडर्स*📿

 

👉 जिल्ह्यातील होलसेलर आणि रिटेलर शॉप

 

👉 गणपतीसाठी लागणारे सर्व प्रकारचे रंग 🎨, ज्वेलरी👑📿, ब्रश🖌️, कॉम्प्रेसर, क्ले टूल्स, इतरही सर्व साहित्य होलसेल दरात मिळतील.😇

 

👉 शाडू माती व प्लास्टर(POP) मिळेल.

 

🎴 *ओंकार ट्रेडर्स*

*माणगाव तिठा, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

 

*प्रो. प्रा. श्रीम. योगिता तामाणेकर*

 

☎️ *संपर्क :* ०२३६२ – २३६२६१

📱 *मो.९४२३३०४७९६,* *७७७४९००५०१,* *९४२१२६१०८९,* *९८३४३४३५४९*

 

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा