You are currently viewing दीपक केसरकर सुतिकागृहाची जागा मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलसाठी देतो, उद्या पासून काम सुरू करा – दिलीप नार्वेकर 

दीपक केसरकर सुतिकागृहाची जागा मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलसाठी देतो, उद्या पासून काम सुरू करा – दिलीप नार्वेकर 

दीपक केसरकर सुतिकागृहाची जागा मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलसाठी देतो, उद्या पासून काम सुरू करा – दिलीप नार्वेकर

सावंतवाडी

दीपक केसरकर सुतिकागृहाची जागा मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलसाठी देतो, उद्या पासून काम सुरू करा, त्या ठिकाणी पंधरा मजली इमारत होण्यासारखी पूर्ण स्ट्रक्चर उभारण्यात आले आहे. ही जागा शहरात आहे. त्यामुळे याबाबत सकारात्मक भूमिका घ्या, अशी मागणी सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप नार्वेकर यांनी आज येथे केली. दरम्यान राजघराण्याकडून जमीन मिळण्यास अडचणी होत आहे. त्यामुळे सावंतवाडी शहराच्या मध्यभागी आणि हॉस्पिटलच्या बाजूला असलेल्या या जमिनीचा केसरकाराने पर्याय स्वीकारावा आणि लोकांना गोवा-बांबुळी येथे जाण्यापासून वाचवावे, अशी त्यांनी हाक दिली आहे.

आज या ठिकाणी श्री. नार्वेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांना घेऊन त्या इमारतीची पाहणी केली. यावेळी ते म्हणाले, आपण दोन वर्षांपूर्वी सावंतवाडी शहराला लागून असलेल्या भागात पाच एकर जागा मोफत देतो, असे सांगितले होते. परंतु ती जागा शहराच्या बाहेर आहे, असे सांगून केसरकर यांनी जागा नाकारली. याचे क्रेडिट फक्त मला मिळेल. त्यामुळे त्यांनी माझा हा प्रस्ताव नाकारला. ही वस्तुस्थिती आहे. परंतु माजी नगराध्यक्ष आणि आयुर्वेदिक संस्थेचा अध्यक्ष म्हणून मी आता सुतिकागृहाची जागा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल साठी देण्यास तयार आहे. त्या ठिकाणी दोन मजले बांधून पूर्ण झालेले आहेत. पार्किंगची जागा मुबलक प्रमाणत आहे. लिफ्टची सोय आहे. आवश्यक असलेले नगरपालिकेच्या परवानग्या मिळालेल्या आहेत. दोनशे कॉटचे हॉस्पिटल त्या ठिकाणी होऊ शकते. त्यामुळे ती जागा ताब्यात घेऊन उद्यापासून काम सुरू करा आणि अत्यावश्यक परिस्थितीत गोवा-बांबुळी किंवा कोल्हापूर-बेळगाव या ठिकाणी जाणाऱ्या रुग्णांना सावंतवाडी आरोग्याची सोय होईल त्यासाठी प्रयत्न करा, असे ते म्हणाले.

आयुर्वेदिक संस्थेच्या माध्यमातून सावंतवाडीत गेली अनेक वर्षे येथील रुग्णांना चांगले सुविधा दिली जात आहे. तब्बल ५० हजाराहून अधिक रुग्णालयात शस्त्रक्रिया झाल्या आहेत. आम्ही हृदयरोगाच्या शस्त्रक्रिया सुद्धा करू शकतो. परंतु त्या ठिकाणी डॉक्टर असले तरी आवश्यक असलेली आधुनिक यंत्रणा आमच्याकडे नाही त्यामुळे आम्ही कमी पडत आहोत. ही सर्व परिस्थिती लक्षात घेता आता सुतिकागृहाची जागा मल्टीस्पेशालिटीसाठी ताब्यात घ्या आणि त्या ठिकाणी तात्काळ काम सुरू करा, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी आपण नगराध्यक्ष असताना सावंतवाडीचा विकास व्हावा यासाठी बेरी आणि बेरी कंपनीकडून सर्वेक्षण करून घेतले होते. त्यानुसार सर्वेक्षण झाले असते तर आज शहराचा विकास झाला असता मात्र दुर्दैवाने त्यात बदल करण्यात आले आणि सावंतवाडी शहराचा नुकसान करण्यात आले, असेही त्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा