You are currently viewing महायुतीच्या योजनेचा फायदा सर्वसामान्य जनतेला झाल्याने तिन्ही उमेदवार भरघोस मतांनी विजयी होतील – श्वेता कोरगावकर

महायुतीच्या योजनेचा फायदा सर्वसामान्य जनतेला झाल्याने तिन्ही उमेदवार भरघोस मतांनी विजयी होतील – श्वेता कोरगावकर

महायुतीच्या योजनेचा फायदा सर्वसामान्य जनतेला झाल्याने तिन्ही उमेदवार भरघोस मतांनी विजयी होतील – श्वेता कोरगावकर

जनतेचा केसरकरांना मोठा प्रतिसाद; त्यामुळे त्यांचा विजय निश्चित

सावंतवाडी

महायुतीच्या योजनांचा लाभ गेल्या अडीच वर्षात तळागाळातील कष्टकरी शेतकरी व सर्वसामान्य जनतेला मिळाला आहे. त्यामुळे नक्कीच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात त्याचा फायदा महायुतीच्या उमेदवारांना होईल. असा विश्वास भाजप महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर यांनी आज इथे व्यक्त केला. दरम्यान राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. त्यासाठी महिला पदाधिकारी मंत्री केसरकर यांच्या प्रचारासाठी आता सज्ज झाले असून नक्कीच केसरकर यांचा भरघोस मतांनी विजय होईल असं विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले सरकारने केलेल्या कामाचा लोकांना पूर्णपणे फायदा झाला आहे. त्यामुळे नक्कीच याचा फायदा या तिन्ही उमेदवारांना होईल तसेच प्रचारात देखील लोकांचा आम्हाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे त्यामुळे या मतदारसंघातून केसरकर यांना अधिकाअधिक मत पडून ते भरघोस मतांनी विजय होतील असा विश्वास सौ.कोरगावकर यांनी व्यक्त केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा