You are currently viewing चष्मा…

चष्मा…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी शशांक देशमुख लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*चष्मा…*

 

दुनियेत गोल ऐशा

सत्यास कोण? बघतो

चष्म्यात पारदर्शक

अंधार खूप सजतो ।। १ ।।

 

स्वार्थात लिप्त माणूस

ठेवून भ्रष्ट मनशा

सोयीनुसार अपुल्या

चष्मा ओढतो हवासा ।। २ ।।

 

उरली न दूरदृष्टी

जडली निकट-दृष्टी

बघुनी सीमित जो तो

बघतोय सौख्य-सृष्टी ।। ३ ।।

 

दृष्टी असून देखील

अंधत्व धारती जन

जीवन उपवनाचे

करती विराण रण ।। ४ ।।

 

चष्मा ओढून माणूस

जपतो दृष्टी तिरकी

तोडून शब्द वचने

घेतो क्षणात गिरकी ।। ५ ।।

 

जनजन गुंग येथे

दावण्यात वरचष्मा

वर्चस्व सिद्ध करण्या

ओकती अंगार उष्मा ।। ६ ।।

 

✍️शशांक दिनकरराव देशमुख ©®

चांदुरबाजार, जि. अमरावती

मो. क्र. ९९२३५३६३२५

प्रतिक्रिया व्यक्त करा