*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम काव्यरचना*
*माझा गाव*
डोंगराच्या पायथ्याशी छान माझा गाव आहे
पांडुरंगी पावलांशी फक्त त्याचा भाव आहे ।।
मुखी ज्यांच्या राम नाम स्वभावाने अवधूत
त्र्यंबकांच्या “शं” कृतीला फक्त येथे वाव आहे।।
उगवतीचे अंशुमी जे उजळती गाव सारा
गोड येथे सर्व लोक सुकृताने साव आहे ।।
घरोघरी अंगणात सडा रंग श्रृतार्थाचा
गावकीच्या विरिञ्चिचे सर्व दूर नाव आहे ।।
दुःख पळवितो देव रुप घेतो दुर्गेशाचे
चिन्मयीच्या यागसाठी सर्वांचीच धाव आहे ।।
सोsहम् जप दिन-हाटी ऋचा ओठी चिदंबर
चंद्र रश्मी निजवीती सर्व येथे राव आहे ।।
*©सर्वस्पर्शी*
©कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख.
मुंबई नाका नाशिक ४२२०११
९८२३२१९५५०