You are currently viewing कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघातील धनगर समाजासहित भटके विमुक्त समाजाचे प्रश्न आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून मार्गी लागले – आमदार नितेश राणे यांचा विजय निश्चित

कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघातील धनगर समाजासहित भटके विमुक्त समाजाचे प्रश्न आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून मार्गी लागले – आमदार नितेश राणे यांचा विजय निश्चित

*कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघातील धनगर समाजासहित भटके विमुक्त समाजाचे प्रश्न आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून मार्गी लागले – आमदार नितेश राणे यांचा विजय निश्चित*

*विधानसभा मतदारसंघातील धनगर समाजासहित भटके विमुक्त समाज नितेश राणेंच्या पाठीशी खंबीर उभा राहणार*

*भाजपा भटके विमुक्त आघाडी कणकवली देवगड विधानसभा संयोजक- रामचंद्र उर्फ बाळू कोकरे*

*कणकवली-*

आमदार नितेश राणे साहेब यांच्या माध्यमातून कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघातील धनगर वाड्या व भटके विमुक्त जाती-जमातीचे सर्व समाजाला योग्य न्याय मिळाला आहे. महाराष्ट्रात महायुती सरकारकडून अनेक योजना भटके विमुक्तांसाठी राबवण्यात आल्या या सर्व योजना सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रखरतेने राबवण्याचा प्रयत्न भाजपा भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष नवलराज काळे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व पदाधिकारी करीत आहोत. राज्य सरकारचे प्रतिनिधी आमदार म्हणून सन्माननीय नितेश राणे साहेब यांनी कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघांमध्ये या योजनेचा प्रसार करून जनसामान्यांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचवला आहे. वैभववाडी देवगड कणकवली मधील धनगर वस्त्यांवरती रस्ते पाणी वीज अशा प्रकारचे अनेक विकास कामे त्यांनी विरुद्ध पक्षात असताना देखील दिले आहेत सत्तेत असताना अनेक धनगर वास्त्या विकसित करण्याकरिता त्यांनी निधी पुरवला आहे. राज्यामध्ये धनगर आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना राज्य सरकारचे आमदार म्हणून कार्यरत असताना देखील आमदार नितेश राणे यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाचा पाठिंबा जाहीर केला होता. सन्माननीय राणे साहेबांनी नेहमीच धनगर समाजाला प्रत्येक क्षेत्रात न्याय दिला आहे. सन्माननीय राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली वैभववाडी तालुक्यात सभापती उपसभापती पद धनगर समाजाला देण्यात आलं होतं. भारतीय जनता पार्टीच्या वतीने दोडामार्ग येथे देखील धनगर समाजाला सभापतीपद मिळालं होतं. वैभववाडी तालुक्यात नगरपंचायतीमध्ये भटके विमुक्त आघाडीतील बेलदार समाज गोपाळ समाज मधील समाज बंधू-भगिनींना नगराध्यक्ष उपनगर अध्यक्ष नगरसेविक नगरसेविका, नगरपंचायतीतील विविध सभापतीपद असे प्रतिनिधित्व करण्याची संधी राणे साहेबांनी दिली. आता देखील अनेक ठिकाणी सरपंच ग्रामपंचायतचे सदस्य भारतीय जनता पार्टी व महायुतीचे आहेत. वाडीवस्तींचा विकास असो किंवा राजकीय प्रतिनिधित्व करण्याची संधी असो सर्व स्तरावरून सन्माननीय राणे साहेब व भारतीय जनता पार्टी महायुतीने धनगर समाजासहित भटके विमुक्त जाती जमातीला न्याय दिला आहे. व येणाऱ्या काळात देखील सर्व स्तरावरून आम्हाला न्याय मिळेल असा आम्हाला विश्वास आहे त्यामुळे विधानसभा मतदारसंघांमध्ये सन्माननीय नितेश राणे साहेब यांचा वाडी वस्ती वरती जाऊन प्रचार चालू केला आहे व त्यांना बहुमताने निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत. आम्ही सर्व समाज बांधव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. विधानसभा मतदारसंघातील भटके विमुक्त आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी महायुती सरकारने राबवलेल्या प्रभावशाली योजना, मतदार संघातील आमदार नितेश राणे यांचे काम जनतेपर्यंत पोहोचवून त्यांना प्रचंड बहुमताने विजय करण्यासाठी प्रचारास सहभागी व्हावं असं आवाहन प्रसिद्धी पत्रकाद्वारे भाजपा भटके विमुक्त आघाडी कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदार संघाचे संयोजक श्री रामचंद्र उर्फ बाळू कोकरे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा