सिंधुदुर्ग जिल्ह्यात 18 ते 19 वयोगटातील 12 हजार 316 तर 85 वर्षावरील 10 हजार 198 मतदार
सिंधुदुर्गनगरी :
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 03 विधानसभा मतदार संघात एकूण 6 लाख 78 हजार 928 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये पुरूष मतदार 3 लाख 36 हजार 991 , स्त्री मतदार 3 लाख 41 हजार 934 तर 3 तृतीयपंथीयांचा समावेश आहे. विधानसभा मतदार संघ निहाय संख्या पुढीलप्रमाणे. 268 कणकवली विधानसभा मतदार संघात एकूण 2 लाख 31 हजार 740 (पुरूष 1 लाख 14 हजार 379, स्त्री 1 लाख 17 हजार 359 तर 02 तृतीयपंथी एवढे मतदार आहेत. 269- कुडाळ विधानसभा मतदार संघात एकूण 2 लाख 17 हजार 186 (पुरूष 1 लाख 7 हजार 964, स्त्री 1 लाख 9 हजार 221 तर 01 तृतीयपंथी) मतदार आहेत. 270 सावंतवाडी विधानसभा मतदार संघात एकूण 2 लाख 30 हजार 02 (पुरूष 1 लाख 14 हजार 648 तर स्त्री 1 लाख 15 हजार 354)मतदारांचा समावेश आहे.
जिल्ह्यात दिव्यांग मतदारांची एकूण संख्या 8 हजार 82 एवढी आहे. यामध्ये पुरूष मतदार 4 हजार 473 तर 3 हजार 609 स्त्री मतदारांचा समावेश आहे. विधानसभा मतदार संघ निहाय संख्या पुढील प्रमाणे. 268- कणकवली एकूण दिव्यांग मतदार 6 हजार 321 (पुरूष 3 हजार 330, स्त्री 2 हजार 991), 269- कुडाळ विधानसभा मतदारसंघ एकूण दिव्यांग मतदार 837 (पुरूष 518, स्त्री 319) तर 270 सावंतवाडी विधानसभा मतदार संघात एकूण दिव्यांग मतदार 924 (पुरूष 625, स्त्री 299) एवढे आहेत.
85 वर्षांवरील मतदारांची एकूण संख्या 10 हजार 198 असून यामध्ये 3 हजार 853 पुरूष मतदार, 6 हजार 344 स्त्री मतदारांचा तर 1 तृतीय पंथीयाचा समावेश आहे. विधानसभा मतदार संघ निहाय संख्या पुढील प्रमाणे. 268- कणकवली मतदार संघांतील 85 वर्षांवरील मतदारांची एकूण संख्या 3 हजार 662 (पुरूष 1हजार 402, स्त्री 2 हजार 260), कुडाळ विधानसभा मतदार संघामध्ये एकूण मतदार 3 हजार 179 (पुरूष 1 हजार 205, स्त्री 1 हजार 973 तर 1 तृतीय पंथीय) सावंतवाडी विधानसभा मतदार संघामध्ये एकूण मतदार 3 हजार 357 (पुरुष 1 हजार 246, स्त्री 2 हजार 111) एवढे आहेत.
जिल्ह्यात 18 ते 19 वयोगटातील एकूण 12 हजार 316 मतदार आहेत. यामध्ये पुरूष 6 हजार 830, स्त्री 5 हजार 485 तर 01 तृतीयपंथी) मतदाराचा समावेश आहे. विधानसभा मतदार संघ निहाय संख्या पुढील प्रमाणे. 268- कणकवली विधानसभा मतदारसंघात एकूण 4 हजार 331 (पुरूष 2 हजार 427, स्त्री 1 हजार 903 तर 01 तृतीयपंथी) मतदाराचा समावेश आहे. 269 कुडाळ विधानसभा मतदार संघात एकूण 4 हजार 303 (पुरूष 2 हजार 411 तर स्त्री 1 हजार 892) मतदारांचा समावेश आहे. 270 सावंतवाडी विधानसभा मतदार संघात एकूण 3 हजार 682 (पुरूष 1 हजार 992, स्त्री 1 हजार 690) एवढे आहेत.