You are currently viewing ठाकरे शिवसेना यापुढे प्रथमेश तेली यांच्या इशाऱ्यावर

ठाकरे शिवसेना यापुढे प्रथमेश तेली यांच्या इशाऱ्यावर

ठाकरे शिवसेना यापुढे प्रथमेश तेली यांच्या इशाऱ्यावर

भाजपा तालुकाध्यक्ष सुधीर दळवी यांचा सूचक इशारा

दोडामार्ग
दोडामार्ग तालुक्यातील कोणालाही विचारा सुधीर दळवी म्हणजे राजन तेली यांच्या गळ्यातील असे म्हणतील कारण त्यांच्यासाठी आपण कामही तसेच केले होते मात्र माझ्यासाठी पक्षनिष्ठा महत्वाची आहे. भाजपामध्ये असताना राजन तेली यांचा मुलगा प्रथमेश तेली यांनी गटबाजी केली त्यामुळे उबाठा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यानी सावध राहून डाव ओळखावा असा सूचक इशारा भाजपाचे दोडामार्ग तालुकाध्यक्ष सुधीर दळवी यांनी दिला.
दोडामार्ग येथे विभागवार प्रचार दौऱ्यात त्यांनी खदखद व्यक्त केली ते म्हणाले, भाजपाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी दिपक केसरकर यांचेच काम केले पाहिजे. प्रत्येकावर वरिष्ठाची नजर आहे जे महायुती विरोधी काम करतील त्यांना प्रथम समज दिली जाईल आणि नंतर कारवाई होईल. तेली यांच्याबाबत आपले अनुभव वाईट आहेत ते ज्या पक्षात जातील तिथे गटबाजी करतील आणि प्रथमेशशी बोलून घ्या म्हणतील यापुढे प्रथमेश तेली यांचे आदेश उबाठा शिवसेनेच्या पदाधिकारी मानतील काय? असा खोचक सवालही त्यांनी उपस्थित केला

प्रतिक्रिया व्यक्त करा