‘स्मृतीगंध”
(किस्सा निवडणूक प्रचाराचा)
साधारणपणे तीस पस्तीस वर्षापूर्वीची निवडणूक आणि आताच्या निवडणूका यामध्ये जमीन अस्मानाचा फरक. फार पूर्वीपासून काँग्रेसने कंदिलाच्या उजेडात मतदारानां चिरीमिरी वाटण्याची प्रथा सुरू केली. माञ आता काही कम्युनिस्ट विचारांचे पक्ष अपवाद म्हणून सोडले तर बाकी सगळेच पक्ष हे अगदी रद्दीसारखा पैसा वाटतात ते सुद्धा अगदी दिवसा ढवळ्या. जिथं जो पक्ष सत्तेवर असेल तो पक्ष सगळ्याचं शासकीय यंत्रणेचा वापर करत असतो. त्यामुळे निवडणुकीत सामान्य लोकांचे मुद्दे हे नेहमीच भरकटतात. गेल्या साडेदहा वर्षात केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपाने तर संसाधने आणि पैसा याचा वारेमाप वापर केलेला आहे. अर्थात काँग्रेसला संधी मिळाली तर ते सुद्धा पुन्हा मुळासकट खायला सुरुवात करतील यात शंका नाही. संधी ( सत्ता) मिळाली की भ्रष्टाचार हे आता उघड उघड सत्य आहे.
आजच्या निवडणूका ह्या अतिखर्चिक असून सामान्य कार्यकर्त्याचे ते काम नाही. त्या त्या भागातील नेते, कार्यकर्ते यांना ही एक चालून आलेली संधी असते. साधारण महिना भरापूर्वी एका हाॅटेलमध्ये एका पतसंस्थेचा मॅनेजर व कर्जदार यांच्यातील संवाद म्हणजे निवडणूकीतील पैशांचा खेळ किती खोलवर पोहचलाय हे अधोरेखित होत.
थकीत कर्जदाराला पतसंस्थेचा मॅनेजर थकलेल्या कर्जाची आठवण करतो त्यावर तो कर्जदार अगदी आत्मविश्वासाने सांगतो की दिवाळीनंतर दोन्ही हप्ते भरतो.. त्यावर ते मॅनेजर म्हणतात, एकदम दोन हप्ते कुठून भरणार? त्यावर तो कर्जदार म्हणतो,साहेब फक्त निवडणूक जाहीर होऊदे..
याच अनुषंगाने निश्चित साल आठवत नाही पण ९६/ ९७ सालातील गोष्ट मला आठवली. आडेली या जिल्हा परिषद मतदारसंघातील तत्कालीन भाजपाचे निष्ठावंत व आदर्श जि. प. सदस्य स्व. अशोकराव बोवलेकर यांचे अकाली निधन झाल्याने रिक्त जागेवर पोटनिवडणुक लागली होती. तेव्हा भाजपाचे जिल्हाध्यक्ष होते श्री माधवराव भांडारी आणि मी तेव्हा जिल्हा चिटणीस व वेंगुर्ला तालुका भाजपाचा पालक ( प्रभारी) होतो. त्यामुळे त्या पोटनिवडणुकीची जबाबदारी माधवरावांनी माझ्यावर सोपवली होती. सेना भाजप युती होती. प्रचार सुरु झाल्यावर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचा समन्वय व प्रचार यंत्रणा राबवण्या संदर्भात मी खानोलीचे बाळा सावंत, श्री साईप्रसाद नाईक यांच्या मदतीने मिटींग लावली. भाजपाचे उमेदवार होते बाबा राऊत. मठात ही मिटींग झाली. मिटींग संपल्यावर सेनेच्या एका पदाधिकाऱ्याने मला हळूच बाजूला बोलवून नेले व म्हणाले, अहो, पार्सेकर तुमचा मिटींगमध्ये “बौद्धिक” ऐकला. निवडणूको असल्या प्रवचनावर लढले जायनतं नाय, मोड काय आणल्यात ती सांगा, बाबा निवडून येवक हवे आणि आम्ही प्रचारात उतराकं व्हया तर पैशांची व्यवस्था करा.. वगैरे, वगैरे.. ” मी माझी स्वतःची बजाज कप गाडी आणि त्यात पेट्रोल पण स्वतःच्याच पैशात हे सगळं मी त्या पदाधिकाऱ्याला विनवणी करून सांगत होतो. पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. मी माझ्या सहकाऱ्यांना विषय सांगितला. ते म्हणाले, माधवरावांशी बोला. मी घरी आलो व राञौ माधवरावांना फोनवर ही घटना सविस्तर सांगितली. माधवराव म्हणाले दोन दिवस थांबा बघू काय व्यवस्था होते ती. पैशाची व्यवस्था न झाल्याने त्या पदाधिकाऱ्याने प्रचार थांबवला. मात्र आमचे भाजपाचे “त्या काळातील ” पदाधिकारी प्रचार करत होते. मला खर्च फक्त सावंतवाडीतून वेंगुर्ल्यात जाण्यासाठी पेट्रोलचाच होता तो मी करत होतो. जेवण दुपारी कार्यकर्त्याच्या घरी… आता थ्री स्टार हाॅटेलमध्ये व्यवस्था असते. दोन दिवसांनी माधवरावांनी दोडामार्ग येथील भाजपा पदाधिकारी जे कंञाटदार होते त्यांच्याकडून दहा हजाराची व्यवस्था केली. मी ते दहा हजार भाजपाच्या एका पदाधिकाऱ्यांच्या समोर त्या सेना पदाधिकाऱ्याला दिले.. त्यानंतर तीन चार दिवस तो पदाधिकारी प्रचारात सक्रिय झाला.
आज अगदी रद्दी कमी पडेल असा पैशाचा पाऊस पडतोय. त्या काळात अगदी पाच हजार आवश्यक खर्चाला मिळणे मुश्किल होत.. जमाना बदल गया है…. आपल्याला बदलता यायला पाहिजे… तरचं आजच्या राजकीय व्यवस्थेत व प्रवाहात टिकू शकता..
.. अॅड. नकुल पार्सेकर…
______________________________
*संवाद मीडिया*
*🚔 कृष्णामाई बोअरवेल*🚍
*💦 आमच्याकडे ४.५’ , ६’ आणि ६.५’ बोअरवेल खोदून मिळेल*🏟️
*💦 तसेच HDPE पाईप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन व पंप सेट लगेच बसवून मिळतील.*
https://sanwadmedia.com/114772/
*💦 रस्त्यापासून ५०० फूट अंतरावर लांब गाडी लावून अडचणीच्या ठिकाणी देखील बोअरवेल खोदून मिळेल*🚖🏟️
*👉 पत्ता : मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे, तालुका कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*
*♻️ प्रोप्रा. : आनंद रामदास*
*संपर्क*
*📲9422381263 / 📲7720842463*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/152648/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*