सावंतवाडी :
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) जिल्हा समन्वयक चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांनी मंगळवारी पदाचा आणि सदस्य पदाचाही राजीनामा दिला आहे.
बाळा गावडे हे विधानसभेचे प्रबळ दावेदार होते. मात्र आयत्यावेळी भाजपा मधून उबाठा मध्ये प्रवेश केलेल्या माजी आमदार राजन तेली यांना अधिकृत उमेदवारी दिली गेली.
त्यामुळे नाराज असलेले बाळा गावडे अज्ञातवासात होते. दरम्यान मंगळवारी सकाळी त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे राजीनामा पत्र पाठवले आहे.