You are currently viewing चंदामामाची भाऊबीज..

चंदामामाची भाऊबीज..

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री पुष्पा सदाकाळ लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*चंदामामाची भाऊबीज..*

 

पवित्र नात्याचं बंधन

आला भाऊबीज सण

वाट  बघते रे बहिण

ताटी सजवून निरांजन

 

चंद्रमौळी झोपडीत माझ्या

ये ना आज भाऊराया

मुलांचा तू लाडका चंदामामा

आमुची तुजवर आभाळमाया

 

सजवून झोपडीचे अंगण

रांगोळी रेखिली सुंदर

तबकी अक्षदा कुंकू तय्यार

नटखट कलंदर ये लवकर

 

ओवाळीन लाडक्या भाऊराया

तव हस्याचा चंदनी सडा

मांडला तुजसाठी सोहळा

नयनांच्या भिजल्या रे कडा

 

गरीब जरी बहिण तुझी

ओथंबली मायेने पुरती

डोंगर माथ्यावर बसे दडून

खेळ लपाछपी खेळे गमती

 

भाऊबीजेचा आज सण

टिळा याला लावू कशी

अरे लडिवाळा भोळा

जाऊन बैसला ऊंच आकाशी

 

काय देशील तू ओवाळणी

रितेच नको ठेवू  ताट

आईचं दुसरं रुप बहिण

पदराचा शेव केला पाट

 

आपुले हे अतूट नाते

राहू दे अखंड तेवत

मुलांचा तू लाडका चंदामामा

हृदयी प्रीत राहो जागत

 

*पुष्पा सदाकाळ भोसरी पुणे*

*9011659747*

प्रतिक्रिया व्यक्त करा