*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा. सदस्य तथा लालीत्य नक्षत्रवेल समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर (दीपी) लिखित अप्रतिम काव्यरचना*
*वृत्त व्योमगंगा*
(लघु गुरू सूट घेऊन)
*दिवाळी*
अंगणी माझ्या दिवाळी दीप तेजाने चमकली
हास्य ओठी देत सारे दुःख ती घेऊन गेली
पुष्पमाळा द्वार भेटी रंग रांगोळीत सजले
सौख्य वाटे पाहताची सोयऱ्यांशी भेटलेले
रोशनीच्या या सणाला अंधकारा दूर सारू
राग लोभा रोखुनी उधळू सुखाने हर्ष वारू
अंतरीचे द्वेष काढू स्वच्छ मैत्री पूल बांधू
गोडधोडाच्या निमित्ताने मनाचा जोड सांधू
तांदळांना भीजवूनी मग अनार्से घाट घालू
मोल कष्टाचे उमजण्या वाट अंधारात चालू
का फटाके जाळुनीया व्यर्थ पैसा घालवूया
या सणांचा एक हेतू द्वेष भावा संपवूया
*【दीपी】*
दीपक पटेकर, सावंतवाडी
८४४६७४३१९६