मुस्लिम समाजाला न्याय देण्यासाठी निवडणूक रिंगणात
कणकवली :
हिम्मत है बुलंद कर अपने आवाज..कणकवली विधानसभा लढणे को तयार है बंदा नवाझ..मी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. आमचा प्रचार सुरु आहे. विरोधक चुकीच्या पद्धतीने टीका टिप्पणी करत आहेत. संदेश पारकर राणेंचा माणूस म्हणून बोलत आहेत. भाजपा आमदार नितेश राणे यांच्याशी माझा कोणताही संबंध नाही. हिम्मत असेल तर नितेश राणेंनी मुस्लिम समाजासाठी काय केले ? हे जाहीर करावे असे खुले आव्हान अपक्ष उमेदवार नवाज खानी यांनी दिले आहे.
कणकवली येथे पत्रकारांची ते बोलत होते. यावेळी सादिक धोपावूकर, फैज खान, रमजान खाण, जाईद शेख, आफान शेख, परवेज कादरी, इमरान शेख, बाबूल खाडगी उपस्थित होते.
नितेश राणे यांनी नवाझ खानी यांना डमी उभे केले असा संदेश पारकर यांनी दिला. मला उभे करण्याची कोणाला गरज नाही. आ.नितेश राणेंची मला उभे करण्याची औकात नाही. माझ्यावर नागेश मोरये, संदेश पारकर यांनी केलेले आरोप चुकीचे आहेत. निलेश राणे खासदार असताना मी काँग्रेस मध्ये होतो. त्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला. माझा राणे कुटुंबियांशी त्यानंतर काडीमात्र संबंध नाही. तसेच ज्यावेळी निलेश राणे यांचा प्रवेश शिवसेनेत झाला. त्या फोटोत माझा फोटो एडिट करुन चुकीचा फोटो दाखवत आहेत. विरोधकांनी हे खोटे धंदे बंद करावेत असे आवाहन नवाज खानी यांनी केले आहे.
मी वैयक्तिक पातळीवर लढत आहेत. मला हाणामारी किंवा अन्य वातावरण बदलून निवडणूक लढवायची नाही. ज्यावेळी नितेश राणे हे आमदार होते त्यावेळी त्याचे वर्तन ठीक होते. त्यानंतर भाजपाने त्यांना प्रवक्ता केले, तिथपासून सकाळी उठल्यावर मुस्लिम समाजाच्या विरोधात नितेश राणे टीका करत आहेत. ही चुकीची गोष्ट आहे. त्यांना आमचा समाज चोखपणे उत्तर देणार असल्याचे अपक्ष उमेदवार नवाज खानी यांनी सांगितले.
नितेश राणेंना या निवडणुकीत प्रेमानेच उत्तर दिले जाईल. मी निवडणुकीत समाजाला विश्वासात घेवून काम करत आहे. आ.नितेश राणे जितो जिहाद ..बोलतात याचा अर्थ नितेश राणे यांनी सांगावा. माझ्याजवळ नितेश राणे आले तर मी त्यांना अर्थ समजावून सांगेन, आपल्या न्यायासाठी लढणे म्हणजे जीतो जिहाद बोलतात. माझी भूमिका स्वतंत्र भूमिका आहे.