*मनस्पर्शी साहित्य परिवार प्रशासक लेखक कवी राजेश नागुलवार (राजमन) लिखित अप्रतिम काव्यरचना*
🏮🪄🎐🏮🪄🎐🏮🪄🎐🏮🪄🎐
*दीपमाळ माणुसकीची*
चमचम करीत तारकासवे
अशी गाली अलगद हसली
आज मोहक रूपावर मनी
संस्काराची मैफील सजली
जणू पानोपानी गुंफुनिया
दवबिंदुंची मौक्तिक माळ
सर्व सृष्टीत चैतन्याने मग
दिसली कणकरूपी सकाळ
अवघी धरती मोहून रंगली
पसरताच मनभावन आभा
सौंदर्याची उधळण होताच
अवनीवर भरली इंद्रसभा
अंधारातून चंदेरी प्रकाशाने
उजळत आली कानाकोपरा
गाव-खेडे, शहरे, रस्त्यांवर
आनंदे न्हाली आज परंपरा
दिवाळी आली प्रसन्नचित्ती
लक्ष्मीच्या पावली घराघरात
माणुसकी जपून दीपमाळ
आज लावूया सारे अंगणात
**************************
*©️®️🖋राजमन*
*(राजेश नागुलवार)*
*चंद्रपूर*
*9175229509*
🏮🪄🎐🏮🪄🎐🏮🪄🎐🏮🪄🎐