बांद्यात नरकासुर स्पर्धेत दळवीवाडी माजगाव मंडळ प्रथम
आमचीवाडी देऊळवाडी मंडळाचे सलग ८ व्या वर्षी आयोजन
बांदा :
नरक चतुर्दशी निमित्त आमचीवाडी देऊळवाडी आयोजित सिंधुदुर्ग मर्यादित नरकासुर स्पर्धेत युवा कला क्रीडा मंडळ दळवीवाडी माजगाव यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. त्यांना आबा माजगावकर यांच्या हस्ते रोख ११ हजार १११ रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. स्पर्धेत व्दितीय क्रमांक एस.के.बाॅईज काळसेवाडी – सुतारवाडी,बांदा यांनी मिळविला. त्यांना ग्रा.प. सदस्य आबा धारगळकर यांच्या हस्ते ७ हजार ७७७ रुपये तर तुतिय क्रमांक प्राप्त देऊळवाडी बाॅईज बांदा संघाला माजी ग्रा. प. सदस्य गजानन गायतोंडे याच्या हस्ते २ हजार २२२ रुपये देण्यात आले.
सदर स्पर्धेचे उद्घाटन मंडळाचे सदस्य सुनिल माजगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रा. प. सदस्य आबा धारगळकर, साई काणेकर, माजी सरपंच दिपक सावंत, माजी ग्रामपंचायत सदस्य गजानन गायतोंडे, सचिन वीर, अक्षय परब, आप्पा गडकरी, सुधीर साटेलकर, बंड्या नार्वेकर, आबा माजगावकर, संतोष माजगावकर, सुनिल माजगावकर, लवू परब, हर्षद कामत, श्री.योगी आदी उपस्थित होते.
या स्पर्धेमध्ये एकूण १० स्पर्धक संघांनी सहभाग घेतला होता. दिवाळीच्या पूर्वसंध्येला या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावर्षी ही स्पर्धा फक्त सिंधुदुर्ग मर्यादित ठेवण्यात आली होती. स्पर्धेचे परिक्षण मंडळाचे सदस्य भाग्येश धुरी, गौरांग साळगावकर, अक्षय सावंत, देवेश वारंग यांनी केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्वेश मुळ्ये, देवेश वारंग, आशिष सावंत, रोहन सुफल, आकाश सावंत, भाग्येश धुरी, गौरांग साळगावकर, संकेत माजगावकर, भरत माजगावकर, दादा साळगावकर, मयुर परब, बाबु साटेलकर, भागेश साळगावकर, निखिल साळगांवकर, रुपेश माजगावकर, मंदार माजगावकर, साई गवस, निनाद पार्सेकर, काकलो माजगावकर, आदित्य सावंत, गणेश मेस्त्री, भाई म्हाडगूत, सागर कोरगावकर, प्रशांत सावंत, रुपेश सावंत, प्रसाद गावडे, अंशू माजगावकर, राज येवढे, चिंटू कुबडे, गणेश चारी, संकेत आरावंदेकर, सुजल नाईक, गौरेश गवंडी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार राकेश परब यांनी मानले. स्पर्धेचे चित्रिकरण दत्तप्रसाद चव्हाण यांनी केले.