*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*कच्चं घर ! मातीचं…!!*
मातीचा सुगंध येता
घराच अंगण आठवतं
तिथचं नाचत बागडत
बालपण संपलं होतं..!
घर कच्चं होतं
तेही मातीचे होते
घरातले राहणारे
सच्चे मुच्चे होते..!
कावळयाची काव काव
अन् घरी पाहुणे पोचायचे
घराला दार होतं,पण तेही
कायम खुलं राहायचे ..!
साधी गादी साधा बिछाना
तोही अंगणातच झोपायचा
आजीची भूताची गोष्ट ऐकत
तोही घाबरून डोळे मिटायचा ..!
चुलीवर भाकरी भाजली की
अंगणात गाय उभी राहायची
तिला भाकर दिली की मग
आमची पोट भरायला निघायची ..!
कच्च्या घराच्या भींतीला टेकून तुटकी सायकल उभीअसायची
कैची कैची मारत मारत तीही
सा-या गावाला मिठी मारायची ..!
कच्च्या घरांच गांव माझं
कृतार्थ जिवन जगतं होतं
अंगण,गाय,कावळा,भूत,सायकल
आठवणीतलं ते कच्चं घर होतं..!
बाबा ठाकूर धन्यवाद
गुलकंद…तीन..!!