You are currently viewing कणकवलीत महायुतीचे उमेदवार आम. नितेश राणे यांनी भरला उमेदवारी अर्ज

कणकवलीत महायुतीचे उमेदवार आम. नितेश राणे यांनी भरला उमेदवारी अर्ज

*कणकवलीत महायुतीचे उमेदवार आम. नितेश राणे यांनी भरला उमेदवारी अर्ज

* रॅलीत लोटला जनसागर
*हजारोंची गर्दी,ढोल ताशा, घोषणा आणि फटाक्यांची आतिषबाजी
*महाजनसागराच्या उपस्थितीत आमदार नितेश राणे यांनी भारला उमेदवारी अर्ज
*महायुतीच्या हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रॅली निघाली

कणकवली

महायुतीचे उमेदवार आमदार नितेश राणेंनी कणकवली निवडणूक निर्णय अधिकारी प्रांताधिकारी जगदीश कातकर त्यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. आमदार नितेश राणे यांनी तिसऱ्यांदा आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.यावेळी नेते माजी मंत्री नारायण राणे पालकमंत्री रवींद्र चव्हाण शिक्षण मंत्री दीपक भाई केसरकर, श्री निलेश राणे, उपस्थित होते.
,त्यानिमित्त कणकवली गांगो मंदिर ते प्रांत कार्यालय अशी भव्य रॅली काढण्यात आली आहे.या रॅलीने आम.नितेश राणे जावून थोड्याच वेळात उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. श्रीदेव गांगो मंदिरात देवतेला श्रीफळ देऊन रॅली ची सुरुवात करण्यात आली. भाजप नेते नारायण राणे पालकमंत्री रवींद्र चव्हाण शिक्षण मंत्री दीपक भाई केसरकर, श्री निलेश राणे, सौ नीलम ताई राणे सौ नंदिता राणे सौ प्रियंका राणे कुमार अभिराज राणे कुमार निमित राणे, माजी आमदार अजित गोगटे, माजी आमदार प्रमोद जठार, दत्ता सामंत यांच्या हजारो प्रमुख पदाधिकारी आणि जनसागराच्या उपस्थितीत ही रॅली रवाना झाली.
रॅलीमध्ये भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे, आरपीआय माहायुतीचे पदाधिकारी सहभागी झाले आहेत.त्यात भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपनेते संजय आग्रे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक , माजी आमदार अजित गोगटे,माजी आम. प्रमोद जठार,माजी जि. प. अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, विधानसभा प्रमुख मनोज रावराणे, जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, दिलीप तळेकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री व, माजी जि. प. उपाध्यक्ष आरीफ बगदादी,देवगड तालुकाध्यक्ष राजू शेटये, अमित साटम, दया पाटील,
वैभववाडी तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे, प्रमोद रावराणे, दिलीप रावराणे, प्राची तावडे, उषकला केळुसकर, प्रियंका साळसकर, देवगड तालुकाध्यक्ष बंड्या नारकर, जिल्हा चिटणीस अमोल तेली, भाजप अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष नामदेव जाधव आदी सहभागी झाले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा