You are currently viewing खास. नारायण राणे यांनी कुटुंबीयांसमवेत घेतले श्री देव रामेश्वर, नारायणाचे दर्शन

खास. नारायण राणे यांनी कुटुंबीयांसमवेत घेतले श्री देव रामेश्वर, नारायणाचे दर्शन

महायुतीचे उमेदवार निलेश राणे व नितेश राणे यांच्या विजयासाठी साकडे..

 

मालवण :

 

कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार निलेश राणे व कणकवली मतदार संघाचे नितेश राणे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पार्श्वभूमीवर मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर व श्री देव नारायणाचे खासदार नारायण राणे यांनी कुटुंबीयांसमवेत दर्शन घेतले. खासदार नारायण राणे यांचे रामेश्वर नारायण मंदिर परिसरात आगमन होताच पारंपारिक वाद्यांनी त्यांचे स्वागत करण्यात आले. तर सुहासिनींच्या वतीने त्यांचे औक्षण करण्यात आले. यावेळी नीलमताई राणे, प्रियंका राणे, अभिराज राणे उपस्थित होते. रामेश्वर देवस्थानच्या वतीने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. नारायण मंदिरात व रामेश्वर मंदिरात राणे कुटुंबीयांनी दर्शन घेतल्यानंतर निलेश राणे, नितेश राणे यांच्या विजयासाठी साकडे घालण्यात आले.

यावेळी भाजपचे अशोक सावंत, सुरेश आचरेकर, अशोक तोडणकर, दीपक पाटकर, बाबा मोंडकर, सुधीर साळसकर, हरीश गावकर, शिवसेनेचे विश्वास गावकर, महेश कांदळगावकर, जगदीश गावकर, रवी मालवणकर, नीलम शिंदे, नारायण धुरी, विक्रांत नाईक, आबा हडकर, दिलीप बिरमोळे बबन शिंदे, आप्पा लुडबे, अशोक तोडणकर, नारायण लुडबे, यांच्या सह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा